कर्जबाजरीपणाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल..

अमळनेर : कर्जबाजारीपणाला कंटाळून एका शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. युवराज कौतिक पाटील (वय ५३) असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना अमळनेर तालुक्यातील दापोरी बु. येथे घडली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात  आहे.

युवराज पाटील यांच्या शेतात काही पिकत नव्हते. त्यामुळे सतत डोक्यावर कर्जाचा डोंगर वाढत होता. त्यांच्यावर सोसायटीचे कर्ज व उसनवारीने घेतलेले कर्ज होते. यामुळे युवराज पाटील या शेतकऱ्याने आत्महत्या केली. पोलीस याबाबत अधिक चौकशी करत आहेत.

ही घटना शुक्रवार, २१ रोजी सकाळी आठ वाजता उघडकीस आली. याबाबत अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. यातून वैफल्यग्रस्त होऊन त्यांनी शुक्रवारी सकाळी घरातच गळफास घेत जीवनयात्रा संपविली. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. दरम्यान, अमळनेर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.