तिरुपती बालाजीचं दर्शन आता झटपट होणार ! ना तासनतास रांग, ना ऑनलाइनची चिंता; जाणून घ्या सोपा पर्याय…!

---Advertisement---

 

“गोविंदा… गोविंदा…” या नामघोषाने दररोज दुमदुमणाऱ्या तिरुमाला मंदिर येथे लाखो भाविक वर्षभर दर्शनासाठी गर्दी करतात. मात्र, तिरुपती दर्शनाचं नियोजन करणं अनेकांसाठी मोठं आव्हान ठरतं. ३०० रुपयांच्या विशेष दर्शन तिकिटासाठी दोन महिने आधी ऑनलाइन बुकिंग करावं लागतं. तिकीट मिळालं नाही तर मोफत दर्शनासाठी १० ते १५ तास रांगेत उभं राहण्याची वेळ येते. अशा परिस्थितीत अनेक भाविक नाराज होऊन माघारी फिरतात. पण आता एक असा पर्याय उपलब्ध आहे, ज्यामुळे ना ऑनलाइन तिकिटांची धावपळ, ना तासनतास रांगेत थांबण्याची गरज!

ऑनलाइन तिकीट हाऊसफुल्ल झाल्यास ‘बस दर्शन’चा पर्याय उपलब्ध

आंध्र प्रदेश राज्यातील तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) च्या वेबसाईटवर विशेष प्रवेश दर्शन (₹300) तिकीट काही मिनिटांत संपतात. अशावेळी आंध्रप्रदेश आणि तेलंगणा राज्य परिवहन मंडळाच्या बसेस भाविकांसाठी सोयीचा पर्याय ठरत आहेत. आंध्र प्रदेश राज्य मार्ग परिवहन महामंडळ (APSRTC) आणि तेलंगणा राज्य मार्ग परिवहन महामंडळ (TSRTC) यांनी भाविकांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून दिली आहे. या सरकारी बसेसचे तिकीट बुक करताना प्रवाशांना ३०० रुपयांचं ‘स्पेशल एंट्री दर्शन’ तिकीट एकत्र मिळू शकतं. जिथे ऑनलाइन बुकिंगसाठी दोन महिने आधी प्रयत्न करावे लागतात, तिथे RTC बस सेवेद्वारे प्रवासाच्या अवघ्या ५ ते ६ दिवस आधी बुकिंग करून दर्शन तिकीट मिळू शकतं. विशेष म्हणजे, TSRTC दररोज सुमारे १००० भाविकांना या योजनेअंतर्गत दर्शन तिकीट उपलब्ध करून देत आहे.

बसेसचे तिकीट सोबत ‘स्पेशल एंट्री दर्शन’ तिकीट बुकिंग कसं कराल?

  1. www.tsrtconline.in या अधिकृत वेबसाईटवर भेट द्या.
  2. तिरुपतीसाठी बस तिकीट निवडा.
  3. ‘Special Entry Darshan’ पर्याय निवडा.
  4. बस भाडे + ३०० रुपये दर्शन शुल्क भरून बुकिंग निश्चित करा.

सध्या तिरुमालामध्ये मोठ्या प्रमाणावर भाविकांची गर्दी होत आहे. नुकत्याच उपलब्ध झालेल्या आकडेवारीनुसार, एका दिवसात ७० हजारांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतले असून कोट्यवधींची देणगी जमा झाली आहे. अशा गर्दीच्या पार्श्वभूमीवर ‘बस दर्शन’ ही सुविधा अनेकांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. तिरुपती दर्शनासाठी आता तासनतास रांगेत उभं राहण्याची किंवा महिनाभर आधी ऑनलाइन तिकीट मिळवण्याची गरज नाही. सरकारी बस सेवेद्वारे उपलब्ध असलेला हा पर्याय योग्य नियोजन केल्यास वेळ, श्रम आणि तणाव वाचवू शकतो.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---