jalgaon nesw: अप्रिय घटना टाळण्यासाठी पोलिसांचा या धरणावर काटेकोर बंदोबस्त

यावल:  सातपुड्याच्या कुशीतील चुंचाळे-सावखेडासीम जवळील निंबादेवी धरण भरल्यानंतर सांडव्यातून पाणी वाहत असल्याने पर्यटक मोठ्या संख्येने या परिीसरातील दाखल होत आहेत मात्र अप्रिय टाळण्यासाठी पोलीस प्रशासनाने धरण परीसरात चोख बंदोबस्त तैनात केला आहे शिवाय पर्यटकांना धरण परिसरात जावू देण्यास मनाई करण्यात आली आहे. पोलीस प्रशासन, वनविभागासह तहसीलदारांनी स्वत:हा धरण क्षेत्रावर थांबून पर्यटकांना रविवारी माघारी फिरवले तर सातपुड्याच्या निर्सगरम्य वातावरणातील या धरणावर प्रवेश बंदी केल्याने पर्यटकांमधुन नाराजी व्यक्त करण्यात आली.

पर्यटक फिरले माघारी
यावल तालुक्यातील सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या निंबादेवी धरण असून चुंचाळे व सावखेडासीम गावाजवळ हे धरण आहे. या धरणाचे निर्माण करतांना सांडव्याला दोन ठिकाणी पायर्‍या तयार केल्या आहे व त्या पायर्‍या वरून पाणी ओसंडून वाहत असल्याने पायर्‍यांवर बसून पर्यटक अंघोळीचा आनंद घेतात मात्र मोठ्या संख्येने येथे जिल्हाभरातून पर्यटक येत असल्याने कुठलीही अप्रिय घटना घडू नये यासाठी प्रशासन सतर्क आहे.

प्रशासनाकडून आपत्तीजनक परीस्थिती असल्याचे सांगत या धरणावर प्रवेश बंदी करण्यात आली आहे. रविवारी सुटीचा दिवस असल्याने हजारो पर्यटकांनी धरणावर गर्दी केली मात्र त्यांना लांबूनच परतावे लागले. धरणावर तहसीलदार मोहनमाला नाझीरकर यांनी प्रवेश बंदीचे आदेश देत स्वत:हा त्या रविवारी धरण परिसरात थांबून होत्या. पोलीस निरीक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला.
प्रवेश बंदीमुळे पर्यटकांमधून तीव्र नाराजी
पजळगाव जिल्ह्यातील लाखो पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र असलेल्या निंबादेवी धरण आहे. हे धरण कधी भरेल व सांडव्यातून पाणी कधी वाहू लागेल ? याच्या प्रतीक्षेत पर्यटक असतात व यंदा सांडव्यातून पाणी वाहु लागल्यानंतर प्रशासनाने धरणावर पर्यटकांना जाण्या करीता रोखले व येथे प्रवेश बंदी केल्याने पर्यटकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रशासनाकडून सातपुड्याचे वैभव लपवण्याचा हा प्रयत्न असून आपत्ती व्यवस्थापनाच्या नावाखाली सातपुड्याच्या पर्यटन विकासाला यामुळे तिलांजली दिली जात आहे. निसर्गरम्य वातावरणात पर्यटक येण्यास इच्छुक असतात मात्र प्रशासन केवळ दुर्घटनेच्या नावाखाली पर्यटकांना सातपुडा दर्शनापासून वंचित ठेवत आहे.