नवी दिल्ली,
पाकिस्थान आणि चीनच्या कुरापती वाढत असल्या मुळे आता भारताने त्याच्यावरती नजर ठेवण्यासाठी ड्रोन्स ची खरेदी करायचे ठरवले आहे. आणि भारतीय सैन्यला पण या ड्रोन ची मदत होणार आहे चीन आणि पाकिस्तानच्या सीमांवर नजर ठेवण्यासाठी भारतातच तयार झालेले 97 Drones ड्रोन्स खरेदी करण्याचा निर्णय संरक्षण मंत्रालयाने घेतला असल्याची माहिती सरकारी सूत्रांनी दिली. अमेरिकेकडून 31 प्रीडेटर ड्रोन्स खरेदी करण्याच्या निर्णयानंतर भारत आता मेक इन इंडिया प्रकल्पाच्या अंतर्गत अत्यंत सक्षम असलेले 97 ड्रोन्स खरेदी करण्याच्या दिशेने जात आहे. सुरक्षा दलांनी एक अभ्यास केला असून, त्यात मध्यम उंचीवर आणि दीर्घ सहनशक्ती असलेल्या गरजा पूर्ण करण्यासाठी तसेच जमीन आणि समुद्रात नजर ठेवण्यासाठी 97 ड्रोन्सची गरज असल्याचे म्हटले होते.
भारतीय वायुदल 10 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्तन निधीतून हे Drones ड्रोन्स खरेदी करणार आहे. सलग 30 तास हवेत उड्डाण करण्यास सक्षम असलेले ड्रोन्स वायुदलाला मिळत आहेत, तिन्ही दलांनी मागील काही वर्षांत खरेदी केलेल्या 46 पेक्षा जास्त हेरॉन यूएव्हीच्या ताफ्याच्या व्यतिरिक्त हे ड्रोन्स असतील. जे ड्रोन्स अगोदरच सैन्याच्या सेवेत आहेत, त्यांचे आधुनिकीकरण हिंदुस्थान एअरोनॉटिक्स लिमिटेडने मेक इन इंडियाच्या माध्यमातून निर्मात्या कंपन्याच्या भागीदारीत केले आहे.