Winter skin care: हिवाळ्यात त्वचेला सुंदर आणि तजेलदार ठेवायचं, करा ‘हे’ उपाय

Winter skin care: हिवाळ्यात थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे आणि इतर त्वचाविकारांचा धोका सहज निर्माण होतो. या दिवसात त्वचा रखरखीत, कोरडी आणि निर्जीव होते. त्वचेवरील चमक दूर होते. जर या दिवसात त्वचेची योग्य काळजी घेतली नाही तर त्वचेवर ड्रायनेस, खाज, डार्कनेस आणि डाग पडतात.

जर तुम्हालाही हिवाळ्यात तुमची स्किन सुंदर आणि तजेलदार ठेवायची असेल, तर तुम्ही पुढील उपाय करू शकतात.

अति गरम पाण्याने अंघोळ करणे टाळा
हिवाळ्यात अती गरम पाण्याने अंघोळ करणे टाळलं पाहिजे. यामुळे त्वचा अधिक कोरडी होऊन त्यातील तेलकटपणा निघून जातो आणि त्वचा कोरडी होऊन खाज सुटते.

मॉईश्चरयुक्त साबण निवडावा
हिवाळ्यात आपण जो साबण निवडू तो मॉईश्चरयुक्त असायला पाहिजे. नारळाचं दूध काढून अंगाला लावल्याने सुद्धा त्वचेला फायदा होईल. अशा त्वचेला हानीकारक नसणाऱ्या काही घरगुती टिप्स तुम्ही वापरू शकतात.

सकाळी आणि झोपण्यापूर्वी मॉइश्चरायझर वापरा
हिवाळ्यात त्वचा मऊ राहण्यासाठी योग्य मॉइश्चरायझर वापरा आणि सकाळी आंघोळीनंतर आणि रात्री झोपण्यापूर्वी चेहरा मॉइश्चराइज करा. चेहरा मॉइश्चराइज करण्यापूर्वी पूर्णपणे स्वच्छ करून घ्या.

फेस ऑइल
हिवाळ्यात त्वचा सुंदर आणि चमकदार राहण्यासाठी आठवड्यातून दोनदा फेस ऑइल वापरा याने त्वचेवरील कोरडेपणा पूर्णपणे निघून जातो. हे त्वचेला प्रोटेक्ट करायचं देखील काम करते.

त्वचेला डबल क्लींजिंग करा
हिवाळ्यात तुम्ही त्वचा सकाळी आणि संध्याकाळी कोमट पाण्याने डबल क्लींजिंग करा. नंतर मॉइश्चरायझर वापरा.

मसाज करा
आपली स्किन सुंदर आणि तजेलदार राहण्यासाठी मसाज करा. मसाज करण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल किंवा फेस ऑइलने देखील मसाज करू शकता.

या महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा
चेहरा मॉइश्चराइज करण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवून घ्या.
आठवड्यातून दोनदा फेस मास्क किंवा स्क्रबचा वापर करू शकता
तुमच्या स्कीनकेर रुटीनमध्ये फेस सिरमचा देखील समावेश करू शकता .
चेहरा नियमित मॉइश्चरायझर करायला विसरू नका.