Jalgaon News: न्हावीतील नराधम पित्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी

यावल : मुलीच्या दुर्धर आजाराला कंटाळून न्हावी येथील पित्याने आपल्या पाच वर्षीय मुलीला विहिरीत ढकलून तिचा खून केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी फैजपूर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून नराधम पित्याला अटक केली होती. संशयिताला सोमवारी यावल न्यायालयात हजर केले असता सह दिवाणी न्यायाधीश न्या.व्ही.एस.डामरे यांनी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. ठुशा भावलाल बारेला (32) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

विहिरीत ढकलून काढला पळाला. 

अनिता ठुशाशा बारेला (5) या चिमुकलीला दुर्धर आजार असल्याने त्यास कंटाळून आरोपीने मुलीला सोबत घेत तिला विहिरीत ढकलून मूळ गावी पळ काढला होता. पाच वर्षीय अनिताचा मृतदेह गावालगत असलेल्या धीरज सुधाकर चौधरी यांच्या शेत विहिरीत शनिवारी आढळल्यानंतर खळबळ उडाली होती तर तपासात आरोपी पित्यानेच हा खून केल्याचे उघडकीस आले होते. फैजपूरचे सहाय्यक निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने मध्यप्रदेशातील झिरण्याजवळील गुलझरी गावातून रविवारी दुपारी आरोपी पित्याला ताब्यात घेतल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली. छंडा वेरला बारेला (57, गोणट्या पिपल्या, भगवानपुरा, मध्यप्रदेश) यांच्या फिर्यादीनुसार खुनाचा गुन्हा दाखल झाला. दरम्यान, आरोपीला सोमवारी दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.