Today Gold Rate in Jalgaon : सोनं-चांदीच्या दरात घसरण; जळगावच्या सुवर्णपेठेतील आजचे ताजे भाव

#image_title

जळगाव ।  २०२४ हे वर्ष सोनं-चांदीसाठी महत्त्वपूर्ण ठरले आहे. सोन्याने ८० हजारांचा उच्चांक गाठला, तर चांदीने १ लाख रुपयांच्या जवळपास पोहोचून सर्वांना चकित केलं. मात्र, डिसेंबर महिन्याच्या उत्तरार्धात सोनं-चांदीच्या किंमतींनी ग्राहकांना दिलासा दिला आहे. आता २०२५ मध्ये या मौल्यवान धातूंच्या दरात काय बदल होणार, याकडे ग्राहकांचे लक्ष लागले आहे.

लग्नसराईत सोनं-चांदीची मागणी वाढली

देशभरात सध्या लग्नसराईचे दिवस सुरु असून, सोनं-चांदीला मोठ्या प्रमाणावर मागणी आहे. दरम्यान, या महिन्याच्या सुरुवातीला किंमती वाढलेल्या असल्या तरी डिसेंबरच्या मध्यानंतर सोनं-चांदीने मोठी उभारी घेतलेली नाही. किंमतीत चढउतार होत असल्यामुळे ग्राहकांची उत्सुकता कायम आहे.

सोन्याचे दर

गुडरिटर्न्सनुसार, ९ ते १५ डिसेंबर दरम्यान सोन्याच्या किंमतींनी उच्चांक गाठला. मात्र, त्यानंतर किंमतीत घसरण झाली. २५, २६, आणि २७ डिसेंबर रोजी अनुक्रमे १०० रुपये, २८० रुपये, आणि २७० रुपयांनी सोनं महागलं. सध्या २२ कॅरेट सोन्याचा दर ७१,६५० रुपये प्रति १० ग्रॅम तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७८,१५० रुपये प्रति १० ग्रॅम आहे.

चांदीचे दर

चांदीही सोन्याप्रमाणेच डिसेंबरच्या सुरुवातीला तेजीत होती. २३ डिसेंबरला चांदी १०० रुपयांनी स्वस्त झाली, तर २६ डिसेंबरला ती १,००० रुपयांनी महागली. गुडरिटर्न्सनुसार, सध्या एक किलो चांदीचा दर ९२,५०० रुपये इतका आहे.

जळगाव सराफ बाजारातील दर

जळगावच्या सराफ बाजारात सध्या २२ कॅरेट सोनं प्रति १० ग्रॅम ७०,६७८ रुपये (विना जीएसटी) आहे, तर २४ कॅरेट सोन्याचा दर ७७,१०० रुपये आहे. चांदीचा दर ९०,००० रुपये प्रति किलो आहे.

ग्राहकांनी या किंमतींचा आढावा घेऊन योग्य निर्णय घ्यावा, असे तज्ज्ञांचे मत आहे. २०२५ मध्ये सोनं-चांदीच्या किंमतींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याने गुंतवणूकदारांसाठी हे महत्त्वाचे ठरणार आहे.