जागतिक मंदीच्या भीतीने गुंतवणुकीसाठी सुरक्षित मानल्या जाणाऱ्या सोने आणि चांदीसारख्या मालमत्तेची चमक मंदावली आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याची चमक कमी झाली आहे. Good returns वेबसाईटनुसार, आज ५ एप्रिल रोजी सोन्याचे दरात घट झाली असून 24 कॅरेट सोन्याचे दर 980 रूपये प्रति १० ग्रॅम इतके घसरले आहे. सलग दुसऱ्या दिवशी सोन्याचा भाव घसरल्याने ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.
प्रमुख शहरातील दर
मुंबई
22 कॅरेट सोनं – 8,310 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,066 रुपये
पुणे
22 कॅरेट सोनं – 8,310 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,066 रुपये
जळगाव
22 कॅरेट सोनं – 8,310 रुपये
24 कॅरेट सोनं – 9,066 रुपये
चांदीबद्दल बोलायचे झाले तर, दिल्लीत आज सलग तिसऱ्या दिवशी चांदी स्वस्त झाली आहे. तीन दिवसांत चांदीच्या किंमत ११ हजार रुपयांनी कमी झाली आहे आणि आता ती १ लाख रुपयांच्या खाली आली आहे. काही दिवसांपूर्वी एक किलो चांदी १.०५ लाख रुपयांवर पोहोचली होती आणि सोनेही प्रति दहा ग्रॅम ९३ हजार रुपयांच्या पुढे गेले होते.