मेष : कोणत्याही गोष्टीवर विनाकारण बोलू नका, अन्यथा तुमच्या अडचणी वाढू शकतात. तुम्ही तुमच्या आईला तिच्या माहेरच्या लोकांना भेटायला घेऊन जाऊ शकता.
सिंह : तुमच्या वाणीवर तुम्ही जास्त नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराकडू एखादं सरप्राईज गिफ्ट देखील मिळण्याची शक्यता आहे.
कन्या : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी स्वरुपाचा असणार आहे. तुम्हाला तुमच्या कामावर पूर्णपणे लक्ष देण्याची गरज आहे. तसेच, त्यासाठी तुम्ही ऑफिस पॉलिटिक्स पासून दूर राहावं.
तूळ : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस उत्साही असणार आहे. तुम्हाला नवीन मालमत्ता मिळेल, ज्यामुळे तुम्हाला आनंद होईल. तुमच्या सहकाऱ्यांसोबत तुम्ही काही कामाबद्दल चर्चा करू शकता.
वृषभ : कोणत्याही कायदेशीर बाबीत तुम्हाला अनुभवी लोकांचा सल्ला घ्यावा लागेल. तुम्ही तुमचं काम सोडून इतरांच्या कामात गुंतून राहाल, ज्यामुळे तुम्हाला अडचणी येतील.

मिथुन : तुम्हाला कोणत्याही कामाचं नियोजन करावं लागेल, तरच ते पूर्ण होण्याची शक्यता आहे. सासरच्या मंडळींशी सुरू असलेला वाद बोलून सोडवला जाईल. तुमचं एखादं काम पैशांमुळे प्रलंबित असेल तर तेही पूर्ण होईल.
कर्क : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस काहीसा आव्हानात्मक असणार आहे. आज तुम्ही तुमच्या तब्येतीच्या बाबतीत किंचितही हलगर्जीपणा करण्याची गरज नाही. तुमच्या करिअरच्या बाबतीत तुम्हाला थोडा संघर्ष करण्याची गरज आहे.
वृश्चिक : तुम्हाला तुमचे विचार सहकाऱ्यासमोर मांडावे लागतील. तुम्ही एखाद्याला काही बोललात तर नंतर त्याबद्दल तुम्हाला वाईट वाटेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात पूर्ण लक्ष द्यावं लागेल.
धनु : अनेक दिवसांपासून तुमचे जर एखादं काम रखडलं आहे तर ते लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. मित्रांच्या सहकार्याने तुम्ही खूप प्रगती कराल. तसेच, वैवाहिक नात्यात गोडवा टिकून राहील.
मकर : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस चांगला असणार आहे. या काळात तुम्हाला तुमच्या कार्यात चांगलं यश मिळेल. ग्रहांचं संक्रमण देखील असल्या कारणाने तुमचे सध्या चांगले दिवस सुरु आहेत.
कुंभ : या राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस सामान्य असणार आहे. तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक मार्ग खुले होतील. तसेच, आज कोणीही तुमचा वाईट हेतू साधणरा नाही.
मीन : या राशीच्या लोकांसाठी आजच्या दिवसाची सुरुवात थोडी खराब राहील, कारण जे काही काम कराल त्यात नुकसान होण्याची शक्यता आहे.