लखनऊ : उत्तर प्रदेशातील बरेलीमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे डॉक्टर जावेद खान यांनी जिभेच्या ऑपरेशनसाठी आलेल्या एका हिंदू मुलाची बळजबरीने सुंता केली. ही बाब कुटुंबीयांना समजताच एकच खळबळ उडाली. हिंदू संघटनांनीही रुग्णालयाबाहेर पोहोचून घोषणाबाजी सुरू केली. दरम्यान रुग्णालय प्रशासन पीडित मुलाच्या पालकांवर तडजोड करण्यासाठी दबाव टाकत असल्याचे बोलले जात आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे. चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून नियमानुसार कायदेशीर कारवाई केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
प्रत्यक्षात ठाणे बारादरीतील संजय नगर येथील रहिवासी हरिमोहन यादव यांचा अडीच-तीन वर्षांचा मुलगा बोलू शकत नव्हता. यामुळे यादव खूप अस्वस्थ होते. एके दिवशी त्यांना कोणीतरी सल्ला दिला की जर तुमच्या मुलाच्या जिभेचे ऑपरेशन केले तर तो बोलू शकेल.त्यामुळे हरिमोहन यादव यांनी मुलाला जिभेचे ऑपरेशन करण्यासाठी डेलापीर येथील खासगी रुग्णालयात नेले. डॉक्टरांनी मुलाला ऑपरेशनसाठी दाखल केले. मात्र जिभेवर शस्त्रक्रिया करण्याऐवजी डॉक्टरांनी पीडित मुलांची सुंता केली.