नवी दिल्ली: ऑगस्ट महिना सुरू झाला असून या महिन्यात स्वातंत्र्य दिनासह अनेक सण-उत्सव प्रसंग येतील जेव्हा बँकाचे कामकाज बंद राहतील.वेगवेगळ्या राज्यांनुसार ऑगस्ट महिन्यात एकूण 14 दिवस बँका बंद राहतील. या सर्व रविवारी तसेच दुसऱ्या आणि चौथ्या शनिवारी बँका बंद राहतील. जाणून घेऊया सविस्तर.
8 ऑगस्ट (तेंडोंग लो रम फाट): सिक्कीममध्ये बँक हॉलिडे
१५ ऑगस्ट (स्वातंत्र्य दिन): संपूर्ण भारतभर बँकेला सुट्टी
16 ऑगस्ट (पारशी नववर्ष – शहाशाही): बेलापूर, मुंबई आणि नागपूरमध्ये बँक बंद
18 ऑगस्ट (श्रीमंत शंकरदेव यांची तारीख): गुवाहाटीत बँकेला सुट
२८ ऑगस्ट (पहिला ओणम): कोची आणि तिरुअनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी
29 ऑगस्ट (थिरुवोनम): कोची आणि तिरुवनंतपुरममध्ये बँकेला सुट्टी
30 ऑगस्ट (रक्षा बंधन): जयपूर आणि शिमल्यात बँकेला सुट्टी.
३१ ऑगस्ट (रक्षा बंधन/श्री नारायण गुरु जयंती/पंग-लहबसोल): डेहराडून, गंगटोक, कानपूर, कोची, लखनौ आणि तिरुवनंतपुरममध्ये बँक सुट्टी.
साप्ताहिक सुट्टी
6 ऑगस्ट : रविवार
12 ऑगस्ट : दुसरा शनिवार
13 ऑगस्ट : रविवार
20 ऑगस्ट : रविवार
26 ऑगस्ट : चौथा शनिवार
27 ऑगस्ट : रविवार
युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) ने बँकांसाठी कामाचे दिवस आठवड्यातून फक्त 5 दिवस असावेत अशी मागणी केली आहे. कर्मचाऱ्यांना 2 दिवसांची साप्ताहिक सुट्टी मिळते. मात्र, कामकाजाच्या दिवसाचा कालावधी वाढवण्याचाही प्रस्ताव आहे