---Advertisement---

Touch Shock Science : तुम्हाला अचानक स्पर्श केला की शॉक लागतोय? मग, जाणून घ्या काय आहे कारण

by team
---Advertisement---

Touch Shock Science : तुम्हाला अचानक स्पर्श केला की शॉक लागतोय? मग, जाणून घ्या काय आहे कारण आपल्या दैनंदिन जीवनात काही गोष्टी अशा असतात ज्या आपल्याला जाणवतात पण तरीही त्याबद्दल आपण कधीच गांभीर्याने विचार करत नाही. बऱ्याचवेळा ऑफिसमध्ये किंवा घरी बसून आपण काही काम करत असताना अचानक तुम्हाला कोणी स्पर्श केला तर करंट बसल्यासारखे वाटलंय का? ऑफिसमध्ये किंवा घरात असताना करंट बसण्याच प्रमाण का वाढलंय. यामागे नेमकं कारण काय ? जाणून घेऊयात..

आपल्या शरीरातील नसांमध्ये सातत्याने प्रक्रिया होत असतात. आपल्या घरांमध्ये इलेक्ट्रॉनिक उपकरणे असतात. उपकरणांमध्ये विद्युत प्रवाहासाठी ज्या तारा वापरल्या जातात. त्यावर एक प्लॅस्टिकच आवरण असत. त्याप्रमाणे शरिरातील नसांवर सुद्धा एकाप्रकारचं आवरण असतं. आपण एकाच स्थितीत खूप वेळ बसून राहिलो की या नसांमध्ये असंतुलन निर्माण होतं. त्यावेळी शरिरातील इलेक्ट्रॉन्स असंतुलित होतात आणि त्याला अचानक कोणी स्पर्श केला तर म्येलिन शीथ सक्रिय होतात. त्यामुळेच आपल्या शरिराला करंट लागल्यासारखं वाटतं.

न्यूरोलॉजिस्ट सांगतात, जसं घराला वीजपुरवठा करण्यासाठी वायरचा उपयोग केला जातो, त्यात तांब्याच्या तारेवर जसं प्लास्टिकच आवरण लावल जात. तसंच आपल्या शरीरात देखील सतत इलेक्ट्रिकल क्रिया होत राहते.त्याच प्रकारे आपल्या शरीरातील नसांवरही आवरण असत. वैद्यकीय भाषेत याला म्येलिन शीथ असं म्हणतात. जेव्हा तुम्ही दीर्घकाळ एकाच स्थितीत राहता तेव्हा म्येलिन आवरण कधीकधी असंतुलित होते आणि तुम्हाला करंट लागल्यासारखं वाटू लागतं.

अनेक डॉक्टर सांगतात की, करंट बसणे हे त्या व्यक्तीवर अवलंबून असते, जसं काही लोकांना फरक पडत नाही. पण ते त्यांच्या संवेदनशीलतेवर अवलंबून असते. प्लॅस्टिकच्या खुर्चीवर बसलेल असतांना देखील करंट बसल्याचे तुमच्यासोबत अनेकदा जाणवलं असेल. हे घडते कारण जेव्हा आपण प्लास्टिकच्या खुर्चीवर बसतो तेव्हा आपले पाय जमिनीला स्पर्श करत नाहीत. त्या वेळी प्लास्टिकची खुर्ची आपल्या कपड्यांमधून इलेक्ट्रॉन गोळा करते आणि त्यात पॉझिटिव्ह चार्ज जमा होतो आणि तुम्ही खुर्चीवरून उठताच हा चार्ज खुर्चीच्या दिशेने सरकतो आणि त्या वेळी खुर्चीला स्पर्श केल्याने तुम्हाला थोडा करंट जाणवू लागतो.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment