---Advertisement---

हिंदु जनजागृती समितीतर्फे मोटारसायकल रॅली

by team
---Advertisement---

तरुण भारत लाईव्ह न्युज जळगाव :  हिंदु जनजागृती समितीतर्फे रविवारी होणार्‍या सभेच्या प्रचारासाठी शुक्रवारी सकाळी नेहरू चौक परिसरातून मोटर सायकल रॅली काढण्यात आली. या वाहन मोर्चात शेकडो हिंदू जनजागृतीचे स्वयंसेवक पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झााले होते.

हिंदु राष्ट्राचा आवाज बुलंद करण्यासाठी हिंदु जनजागृती समितीतर्फे रविवार २५ डिसेंबर रोजी सायंकाळी ५ वाजता कोर्ट चौक परीसरातील शिवतीथ मैदानावर ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभे’चे आयोजन करण्यात आले आहे. या साठी जिल्हाभरात ठिकठिकाणी बॅनर्स, फलक प्रचार प्रसार करण्यात आला असून शुक्रवारी सकाळी शहरातील नेहरू चौक परिसरातून दुचाकी वाहन रॅली काढण्यात आली. नेहरू चौकातून काढण्यात आलेली रॅली टॉवर चौक, चित्रा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक शिवतीर्थ मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालय, रींगरोड, नूतन मराठा महाविद्यालय मार्गान आणण्यात येवून शिवतीर्थ मैदानावर या रॅलीचा समारोप करण्यात आला. यावेळी हिंदु जनजागृती समितीचे जिल्हा समन्वयक प्रशांत जुवेकर यांच्यासह शहरातील शेकडो पदाधिकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment