Bangladesh-Pakistan-united 53 वर्षांपूर्वीचा डिसेंबर महिना! बांगलादेशात म्हणजे पूर्व पाकिस्तानात जागाेजागी पाकिस्तानच्या विराेधात घाेषणा दिल्या जात हाेत्या, पाकिस्तानचा राष्ट्रीय ध्वज जाळला जात हाेता, भारतीय सैन्याचा जयजयकार केला जात हाेता, ठिकठिकाणी बॅ. माेहम्मद अली जिना यांचा निषेध हाेत हाेता आणि पूर्व पाकिस्तानचे नेते शेख मुजीबूर रहेमान यांच्या नावाने जल्लाेष हाेत हाेता.Bangladesh-Pakistan-united 53 वर्षांनंतर सारेच चित्र बदलले आहे. ठिकठिकाणी शेख मुजीबूर रहेमान यांच्या प्रतिमा एकतर काढून फेकल्या जात आहेत वा त्यांच्या प्रतिमांना काळे फासले जात आहे. प्रथमच पाकिस्तानचे संस्थापक माेहम्मद अली जिना यांचा जन्मदिन बांगलादेशात साजरा केला जात आहे. भारतविराेधी घाेषणा दिल्या जात आहेत. 53 वर्षांत जे झाले नव्हते, ते आज बांगलादेशात हाेत आहे.
अमानवीय अत्याचार Bangladesh-Pakistan-united
बांगलादेशच्या मुक्ती संग्रामात पाकिस्तानी सैन्याने बांगलादेशींवर अमानवीय अत्याचार केले हाेते. पाकिस्तानी लष्कराने केलेल्या हिंसाचारात 30 लाखांवर बांगलादेशी ठार झाले हाेते. अनेकांची घरे जाळण्यात आली हाेती, उद्ध्वस्त करण्यात आली. बांगलादेशी महिलांवर बलात्कार करण्यात आले. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराबद्दल एक प्रकारचा संताप बांगलादेशात तयार झाला हाेता. याउलट भारतीय लष्कराचे ठिकठिकाणी स्वागत केले जात हाेते. स्थानिक जनता भारतीय लष्कराकडे आमचे संरक्षक या भूमिकेतून पाहात हाेती.
आता शस्त्रखरेदी Bangladesh-Pakistan-united
बांगलादेशाने आता त्याच पाकिस्तानकडून शस्त्रखरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. काही लाख बंदुकीच्या गाेळ्या, रणगाड्यात वापरले जाणारे 2000 गाेळे, 40 टन आरडीएक्सच यासह आणखी काही लष्करी साहित्य पाकिस्तानातून आयात करण्याचा निर्णय बांगलादेशच्या हंगामी सरकारने घेतला आहे. देशात माेहम्मद युनूस यांचे हंगामी सरकार आल्यानंतर पाकिस्तान-बांगलादेश संबंधात दिसणारा हा सर्वांत माेठा बदल आहे. विशेष म्हणजे, या शस्त्रसामग्रीचा पुरवठा बांगलादेशला सुरूही झाला आहे.
जमाते इस्लामी Bangladesh-Pakistan-united
बांगलादेशात सक्रिय असणारी जमाते इस्लामी ही संघटना पाकिस्तान समर्थक व भारत विराेधी मानली जाते. शेख हसीना पंतप्रधान असताना त्यांनी या संघटनेवर बंदी घातली हाेती. जमाते इस्लामीची कार्यालये-बँकखाती गाेठविण्यात आली हाेती. शेख हसीना यांनी या संघटनेला कधीही भारतविराेधी कारवाया करू दिल्या नव्हत्या.
बंदी उठविली Bangladesh-Pakistan-united
बांगलादेशातील हंगामी सरकारने जमाते इस्लामीवरील बंदी उठविली आहे. सत्तेवर येताच काही महिन्यांच्या आत जमाते इस्लामीवरील बंदी उठविण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला. या निर्णयाचे पाकिस्तानने स्वागत केले असून, जमाते इस्लामीने आपल्या भारतविराेधी कारवाया पुन्हा सुरू केल्या आहेत. बांगलादेशात हिंदूंना लक्ष्य करणे, हिंदू मंदिरांवर हल्ले करणे यामागे जमातचा हात असल्याचे म्हटले जाते. म्हणजे बांगलादेश सरकार भारतविराेधी कारवाया घडवून आणण्यासाठी जमातचा वापर करीत असल्याचे चित्र तयार हाेत आहे. एकीकडे पाकिस्तानच्या बाजूने जनमत तयार करणे आणि दुसरीकडे भारताच्या विराेधात जनमत तापविणे अशी दुहेरी कामगिरी जमात पार पाडत आहे.
सहकार्याचे नवे युग Bangladesh-Pakistan-united
बांगलादेशातील नवे सरकार सत्तेवर येऊन फक्त काही महिने झाले आहेत आणि दाेन्ही देशांत सर्वच क्षेत्रात सहकार्याचे नवे युग सुरू झाल्याचे वातावरण आहे. जानेवारी महिन्यात ढाक्यात आंतरराष्ट्रीय व्यापार मेळा हाेत असून, यात सहभागी हाेण्याचा निर्णय पाकिस्तानने घेतला आहे. साखर, कांदा, ज्यूट, मासळी, चहा, बटाटे, भाज्या-\ळे या वस्तूंचा व्यापार करण्याबाबत दाेन्ही देशांमध्ये चर्चा सुरू असल्याचे सांगितले जाते. बांगलादेश आजवर भारताकडून साखर आयात करीत असे. आता त्याने पाकिस्तानकडून साखर आयात करण्याचा निर्णय घेतला आहे. पाकिस्तानने 6 लाख टन साखर निर्यात करण्याचा निर्णय घेतला आहे. थायलँड, मध्य आशियातील देश आणि बांगलादेश यांचा यात समावेश आहे. याने पाकिस्तानातील साखर उद्याेगाला संजीवनी मिळेल आणि आपला परकीय चलनाचा साठा वाढेल, अशी आशा पाकिस्तानी नेत्यांना वाटत आहे. केवळ साखरच नाही, तर आणखी काही जीवनावश्यक वस्तूंची आयात पाकिस्तानकडून करण्याचा निर्णय बांगलादेशने घेतला आहे. आजवर ही आयात भारताकडून हाेत हाेती.
नवे सरकार Bangladesh-Pakistan-united
ढाक्यातील पाक उच्चायुक्तांनी बांगलादेश-पाकिस्तान संबंधांवर बाेलताना म्हटले आहे, ‘बांगलादेशातील नव्या सरकारमध्ये पाकिस्तानबाबत कमालीचा सलाेखा दिसत असून, त्यांना पाकिस्तानशी व्यापारी संबंध वाढविण्याची तीव्र इच्छा दिसून येत आहे. या संदर्भात पाकिस्तान पेट्राेलियम लि. व बांगलादेशातील पेट्राेलियम कंपन्या यांच्यात काही करार करण्यात आले आहेत. पाकिस्तान-बांगलादेश यांच्यातील सागरी व्यापार वाढविण्याचाही निर्णय दाेन्ही सरकारांनी घेतला आहे.
मेघालयावर ड्राेन? Bangladesh-Pakistan-united
नव्या बांगलादेशची मजल कुठवर जावी? भारतीय भूभागाची टेहळणी करण्यापर्यंत? काही दिवसांपूर्वी मेघालयावर एक ड्राेन आढळून आले. टर्कीमध्ये तयार झालेल्या या ड्राेनचे संचालन बांगलादेश वायुदलाच्या ‘बशीर‘ या हवाई तळावरून केले जात असल्याचे निर्दशनास आले. या साऱ्याचा अर्थ काय, असा प्रश्न आता भारताला भेडसावू लागला आहे. केवळ काही महिन्यांपूर्वी सत्तेवर आलेल्या सरकारने ही हिंमत दाखवावी, याचेही भारताला आश्चर्य वाटत आहे.
एकीकरणाकडे? Bangladesh-Pakistan-united
1971 पर्यंत जगाच्या नकाशावर एक देश असणारे दाेन देश दाेन भागांत विभक्त झाले. आता त्यांच्यात सहकार्याचे वारे वाहू लागले असून, हे सहकार्य असेच चालू राहिल्यास दाेन्ही देशांचे पुन्हा एकीकरण हाेईल काय, असा प्रश्न आताच विचारला जाऊ लागला आहे. पूर्व जर्मनी व पश्चिम जर्मनी एकत्र येवू शकतात, तर पूर्व पाकिस्तान व पश्चिम पाकिस्तान का एकत्र येवू शकत नाहीत, असे पाकिस्तान व बांगला देशातील काही लाेकांना वाटत आहे. तर, काही विदेशी निरीक्षकांना पाकिस्तान-बांगलादेशचे विलीनीकरण एक अवघड कल्पना वाटते. जर्मनी केवळ एका भिंतीने विभाजित झाला हाेता. ती भिंत उद्ध्वस्त करून दाेन्ही देशांचे एकीकरण करणे तसे साेपे हाेते. पाकिस्तान-बांगलादेशाचे तसे नाही. दाेन्ही देश मुस्लिम असले तरी, त्यांची संस्कृती वेगवेगळी आहे आणि भाैगाेलिक अंतरही बरेच माेठे. या दाेन देशांचे विलीनीकरण ही एक अवघड कल्पना असली तरी, नवे सरकार अस्तित्वात येताच बांगलादेश-पाकिस्तानात सुरू झालेले सहकार्य भारतासाठी नव्या समस्यांची नांदी ठरू शकेल.
आशेचा एक किरण Bangladesh-Pakistan-united
बांगलादेशातील काळवंडलेल्या व धुसर वातावरणात आशा वाटावी, असा एक किरणही आहे. या देशातील सर्वांत प्रमुख अशा ‘द डेली स्टार’ या वृत्तपत्रात नुकताच एक लेख प्रसिद्ध झाला आहे. तीन वर्षांपूर्वी बांगलादेश स्वातंत्र्याचा सुवर्ण महाेत्सव साजरा झाला. त्यानिमित्ताने हा लेख लिहिन्यात आला हाेता. आता त्याचे पुर्नमुद्रण करण्यात आले आहे.
मुफझ्झल हैदर चाैधरी या एका बंगाली साहित्यिकाच्या मुलाचा हा लेख असून, त्याचे शीर्षक आहे, ‘द कंट्री माय ादर वाँटेड’! पाकिस्तानी लष्कराच्या हिंसाचारात लेखकाचे वडील मारले गेलेहाेते. त्याचीच सारी वेदना या लेखात आहे.
दिवस शांतिनिकेतनचे! Bangladesh-Pakistan-united
लेखात म्हटले आहे, बांगला साहित्याचा अभ्यास करण्याची ओढ चाैधरींना शांतिनिकेतनला घेऊन गेली. शांतिनिकेतनमधील वास्तव्याने त्यांच्या जीवनात माेठे बदल घडविले. प्रत्येक परीक्षेत प्रथम येणाèया चाैधरींना रवींद्रनाथ टागाेर यांचे सुपूत्र रतींद्रनाथ टागाेर यांच्या हस्ते रवींद्रनाथांच्या ‘गीतांजली’ या काव्यसंग्रहाची प्रत देण्यात आली. 1947 मध्ये भारताचे विभाजन झाले आणि पाकिस्तानात म्हणजे त्याच्याच देशात त्यांच्याशी भेदभाव केला जावू लागला. शांतिनिकेतन, काेलकाता विद्यापीठ येथे घेतलेल्या त्यांच्या पदव्यांना पाकिस्तान सरकार नाकारू लागले. असे करता करता 1971 साल उजाडले. त्यावेळी पाकिस्तानी लष्कराने ढाक्यातील काही बुद्धिजीवींना पकडून ठार केले. त्यात चाैधरीही हाेते. Bangladesh-Pakistan-united लेखकाने या साèयाचे स्मरण करून देत म्हटले आहे, बांगलादेशने वेगवेगळ्या क्षेत्रात प्रगती केली आहे. आमचा जीडीपी वाढला आहे. अनेक क्षेत्रात बांगलादेश आघाडी मारत आहे. पण, हे सारे करीत असताना, 1971 मध्ये आम्ही ज्या मूल्यांसाठी संघर्ष केला, लढलाे त्याचे विस्मरण हाेऊन कसे चालेल, असा लाख माेलाचा प्रश्न विचारत लेखकाने आपल्या लेखाची सांगता केली आहे. बांगला देशात आज भारतविराेधी सरकार असताना, हा लेख प्रसिद्ध केला जाणे, देशातील सर्वांत माेठ्या वृत्तपत्रात ताे प्रसिद्ध हाेणे, हाच भारतासाठी आशेचा एकमेव किरण आहे.