---Advertisement---
भुसावळ येथील अप्सरा चौक, छबिलदास चौधरी मार्केट व प्यारेलाल भजीया गल्ली परिसरातील हॉकर्स बांधवांच लवकरात लवकर स्थांलातर करण्यात यावं या मागणीसाठी व्यापारी बांधव यांच्यासह माजी नगरसेवक निक्की रमेशलाल बत्रा यांनी दि १० रोजी उपोषण केले.
भुसावळमधील अप्सरा चौक येथे सार्वजनिक बाधकाम विभागाने रोड बनवुन त्यात दुभाजक टाकले असल्यामुळे अनधिकृत हॉकर्स लोटगाड्या रस्त्यात लावत आहे. त्यामुळे खूप ट्राफिक जाम होऊन बाजारात जाण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. ह्या अडचणींमुळे आमच्या दुकानान ग्राहक येण्यास तयार नाही आता पुढील महिन्यात दसरा, दिवाळी आहे त्यामुळे दुकानदारांवर उपासमारीची वेळ येईल असे म्हणत दि १० सप्टेंबर रोजी अप्सरा चौकातिल बाजार वार्ड येथे व्यापाऱ्यांनी उपोषण केले.
सर्व व्यापारी बांधव गेल्या ५० वर्षांपासून बाजारपेठेत आपला उदरनिर्वाह करत आहोत सर्व व्यापारी बांधव वेळेवर नगरपालिकेचा कर भरतात एखाद्या वेळी काही व्यापारी बांधवांना आर्थिक अडचणींमुळे कर भरायचा राहिल्यास नगरपालिकेकडून दुकानांना लगेचच सील केले जाते, येवढ्या प्रमाणात कर भरत असताना देखील व्यापारी बांधवांना कुठल्याही प्रकारच्या सुविधा मिळत नाही.
आमच्या दुकानांनान सामोर हातगाडी वाले त्यांचा गाड्या लावतात त्यांच्या अतिक्रमणामुळे दुकानांवर खरेदीसाठी येणाऱ्या ग्राहकांना दुकानात येण्यासाठी जागा मिळत नाही त्यामुळे व्यापारी आणि हॉकर्स यांच्यामध्ये नेहमीच वाद विवाद होत असतात त्यामुळे हॉकर्स बांधवाना एक आठवड्यात स्थलांतरित करावे असे निवेदन नगरपालिका मुख्यअधिकारी राजेंद्र फातले यांना दिले होते. परंतु याबाबत कुठल्याही प्रकारचा निर्णय न घेतल्यामुळे भुसावल मधील सर्व दुकाने बंद ठेवून सर्व व्यापारी उपोषणा बसले अशी माहिती माजी नगरसेवक निक्की रमेशलाल बत्रा यांनी दिली.