---Advertisement---

दुर्दैवी : भिल्लट देवाच्या दर्शनाला निघाले अन् काळाने केला घात

---Advertisement---

---Advertisement---

भुसावळ : तालुक्यातील भुसावळ येथून जवळच असलेल्या गोजोरे गावचे दोन तरुण भिल्लटदेव दर्शनाला जात असताना जळगाव जिल्ह्यातील अडावदजवळ दुचाकी व जीप च्या झालेल्या भीषण अपघातात दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली.

श्रावण मासानिमित्त भुसावळ शहराजवळील गोजोरे या गावाचे महेन्द्र शांताराम दोडे (३९) व युवराज तुकाराम तायडे (३२) हे सोमवारी (२८ जुलै )रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास अडावदजवळील भिल्लटदेव येथे दर्शनासाठी (एम. एच. १९ बीजे ६८०९) या क्रमांकाच्या दुचाकीवर निघाले होते. अडावदहून चोपडाकडे जाणाऱ्या जीप क्रमांक (एमएच १९ सीएक्स १४१०) ने त्यांच्या दुचाकीला समोरून धडक दिली. यात दोघांचाही जागीच मृत्यू झाला.

जीप चालक मनोज संजय पाटील (२४, रा. वेळा, ता. चोपडा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून अडावद पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात येत आहे. गोजोरे गावातील महेन्द्र शांताराम दोडे (३९) व युवराज तुकाराम तायडे (३२) या दोन युवकांचा अपघातात जागीच मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. या दुर्घटनेनंतर  संपूर्ण गावावर गोजोरे गावावर शोककाळ पसरली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---