पाचोऱ्यात प्लंबिगचे काम करतांना पाचव्या मजल्यावरून पडल्याने भडगाव येथील कामगाराचा दुर्दैवी मृत्यू

---Advertisement---

 

पाचोरा शहरात काम करत असताना एका कामगाराचा अपघाती मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. गिरणा पंपिंग रोडवरील वृंदावन पार्क परिसरातील एका अपार्टमेंटमध्ये प्लंबिंगचे काम सुरू असताना हा अपघात झाला.

या प्रकरणी मोहसीन खान अत्तर खान (वय ३२, रा. गंजीवाडा, भडगाव) यांनी पाचोरा पोलीस ठाण्यात दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे चुलत मामा अजीमोद्दीन शेख रहीमोद्दीन शेख (वय ४४) हे ९ एप्रिल रोजी दुपारी सुमारे तीन वाजता संबंधित ठिकाणी काम करत होते. कामाच्या दरम्यान पाचव्या मजल्यावरून त्यांचा तोल गेल्याने ते थेट खाली पडले.

या अपघातात त्यांना गंभीर दुखापत झाली होती. डाव्या पायाचा पंजा पूर्णपणे फाटला होता, पाठीला मार लागला होता तसेच डोक्यालाही जबर मार बसला होता. घटनेनंतर त्यांना तातडीने पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांना मृत घोषित केले.

या घटनेची पाचोरा पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. अजीमोद्दीन शेख यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी आणि तीन मुली असा परिवार आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल वसीम शेख करत आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---