तरुण भारत लाईव्ह । चंद्रशेखर जोशी । राजकारणात गत काही काळापासून अतिशय गमतीशीर प्रसंग घडत आहे. कुणाला काय स्वप्न पडते तर कुणाला काय अशी परिस्थिती आहे. केवळ जळगाव जिल्हाच नाही तर राज्यात व देशभरात परिस्थिती दिसून येते. परंपरा काँग्रेसने सुरू केली आणि तीच अन्य पक्षांमध्ये कमी अधिक प्रमाणात होकावत गेली. आता बारामतीकरांचे उदाहरण घ्या ना अजितदादांसाठी टी आर पी सध्या जोरात आहे. अगदी संजय पवार यांचा चर्चा सध्या जास्त असतात मग अगदी त्यांचा मोबाईल स्विच ऑफ झाला तरी बातमी येते.
अजित पवार नॉट रिचेबल झाले… भूमिगत झाले की मग त्यांना खुलासा करावाच लागतो. त्यांच्या फेसबुक पेज वरील पक्षाचे चिन्ह गायब झाले आणि त्यावर अन्य कोणत्या पक्षाचे चिन्ह रिकामी जागा भरून काढण्यात यावरूनही वादळ सुरू झाले. जसा पहाटेचा शपथविधी झाला तसेच परिस्थिती सध्या सुरू होते. दोन दिवसांपूर्वीच तर त्यांनी आपल्या मुख्यमंत्रीपदाची चर्चा नव्हे तर पुडी सोडून दिली आणि वादळ सुरू झाले. सध्या कोठे व केव्हा कोसळतील सांगता येत नाही. तसेच राजकीय चर्चांचे ढग कोणत्या नेत्यावर कोसळतील या नेम नाही. काही महिन्यांपूर्वी राज्याच्या राजधानी तसेच बारामती दोन प्रकारचे फलक राज्यभर चर्चेचे ठरले. अगोदर अजित पवारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून फलक झळकले नंतर शरद पवार कन्या खासदार सुप्रिया सुळे यांचे नाव पुढे झाले. उबाठा शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संस्थेची नावे काही काळ मुख्यमंत्री म्हणून चर्चेत होते. याच पद्धतीने खाली जसे येऊन तशी परिस्थिती जिल्ह्यांच्या ठिकाणी दिसून येते जळगावचेच उदाहरण घेताना माजी मंत्री सुरेश दादा जैन हे काही महिन्यांपूर्वी जळगावात आले त्यांनी राजकीय विषय टाळण्याचा प्रयत्न केला पण अनेकानी खोदून खोदून विचारल्यावर त्यांनी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक भाऊ जैन यांचे नाव घेतात. त्यांच्यासारख्यांनी पुढे यावे अशी इच्छा प्रकट करत राजकीय वारसदार घोषित केला. दादांची यादी गोंड्यांची टोपी घालून बसलेले अनेक जण नाराज झाले.
जळगाव शहरासाठी विविध पक्षांचे पहिल्या फळीतील पदाधिकारी व कार्यकर्ते सध्या निवडणुकीच्या तयारीला लागले आहे. अशा चर्चा सुरू असतात यात शिवसेना उबाठाकडून मनपातील विरोधी पक्षनेते सुनील महाजन, भाजप कडून डॉक्टर अश्विन सोनवणे, पारोळातून अमोल पाटील, करण पवार, हे काही मोजके उदाहरणे त्याच पद्धतीने विविध मतदारसंघातून इच्छुकांची भाऊ गर्दी सुरू आहे. इच्छुकांची मोठी यादी तयार होऊ शकेल. परवाचे उदाहरण बघा ना पालकमंत्र्यांचे ज्येष्ठ चिरंजीव यांनी तर यात मोठी आघाडी घेतली. त्यांच्या समर्थकांनी वाढदिवसाचा मुहूर्त साधत जळगाव शहरात विविध भागात फलक बाजी करत प्रतापराव पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देत त्यांना भावी आमदार म्हणून उल्लेख केला. मात्र एक सावधता त्यांनी पाळली कोणत्या मतदारसंघातील आमदार हे घेणे त्यांनी टाळले व सस्पेंस निर्माण केला.
आगामी काळ निवडणुकांचा आहे त्यामुळे बरेच इच्छुक तयारीला लागले आहे. या गोदावरी ग्रुपही मागे नाही. त्यांच्याकडून म्हणे लोकसभेची तयारी सुरू झाली आहे. त्यांचे तर मोठे धक्का तंत्र असेल यावेळी बोलले जात आहे. असो या निमित्ताने कोण कुठे उडी घेईल सांगता येत नाही. त्याच्या चर्चाही सुरू झाले आहेत. त्यामुळे चर्चा सुरू असल्याचे म्हणणे वावगे ठरणार नाही.