जिल्ह्यात 18 हजार 553 कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

जळगाव: लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यातील रावेर व जळगाव या दोन्ही लोकसभा मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात दोन्ही मतदार संघातील सर्व विधानसभा मतदारसंघात एकूण 18 हजार 553 कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रथम प्रशिक्षण देण्यात आले. तर प्रशिक्षणात अनुपस्थित असलेल्या 1 हजार 410 कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आले आहेत.
चोपडा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 412, मतदान अधिकारी क्रमांक एक 420, इतर मतदान अधिकारी 873, रावेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 398, मतदान अधिकारी क्रमांक एक 406, इतर मतदान अधिकारी 1 हजार 141, भुसावळ विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 357, मतदान अधिकारी क्रमांक एक 337,इतर मतदान अधिकारी 517, जळगाव शहर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 438, मतदान अधिकारी क्रमांक एक 418, इतर मतदान अधिकारी 1 हजार 229, जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 422, मतदान अधिकारी क्रमांक एक 403, इतर मतदान अधिकारी 770, अमळनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 388, मतदान अधिकारी क्रमांक एक 387, इतर मतदान अधिकारी 897, एरंडोल विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 353, मतदान अधिकारी क्रमांक एक 364, इतर मतदान अधिकारी 998, चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 420, मतदान अधिकारी क्रमांक एक 415, इतर मतदान अधिकारी 816, पाचोरा विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 457, मतदान अधिकारी क्रमांक एक 449, इतर मतदान अधिकारी 973, जामनेर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 408, मतदान अधिकारी क्रमांक एक 385, इतर मतदान अधिकारी 898, मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघात मतदान केंद्राध्यक्ष 340, मतदान अधिकारी क्रमांक एक 328, इतर मतदान अधिकारी 736 असे एकूण 18 हजार 553 कर्मचाऱ्यांना निवडणूक विषयक प्रशिक्षण देण्यात आले.