जळगाव : जिल्हा पोलीस दलातील १५ सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक असे एकुण ३० पोलीस अधिकारी यांचे बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी २१ रोजी रात्री उशीरा काढले. दरम्यान, बदली झालेल्या पोलीस उपनिरीक्षकांना नवीन पदाचा पदभार तात्काळ घेण्याचे निर्देश देखील पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी दिले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून जळगाव जिल्हा पोलीस दलातील पोलीस उपनिरीक्षकांच्या बदल्यांचे आदेश प्रलंबित होते. महाराष्ट्र पोलीस अधिनियमानुसार सक्षम प्रधिकारी म्हणून जिल्हास्तरावरील पोलीस अस्थापना मंडळ यांना प्रदान असलेल्या अधिकाराचा वापर करून पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांनी आदेश काढले आहे. यात विनंती बदली, नव्याने हजर झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकांच्या नवीन नेमणूका, प्रशासकीय बदली बाबत सर्व बाबींचा विचार करून पोलीस प्रशासनाकडून सोमवारी २१ ऑगस्ट रोजी रात्री उशीरापर्यंत आदेश काढण्यात आले.
यात जळगाव जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्याचे १५ सहाय्यक पोलस निरीक्षक आणि १५ पोलीस उपनिरीक्षक असे एकुण ३० पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश जिल्हा पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी काढले. दरम्यान, बदली झालेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षक यांनी तातडीने आपल्या बदलीच्या ठिकाणी तात्काळ पदभार स्विकारावा तसा अहवाला जिल्हा पोलीस मुख्यालयात पाठविण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक एम.राजकुमार यांनी दिले आहे.