---Advertisement---
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अॅपलशी स्पर्धा करण्यासाठी तसेच ट्रम्पच्या कंपनीने मोबाईल लाँच केला आहे. या फोनची प्री बुकिंग सुरु आहे. परंतु, या फोनच्या विक्रीसाठी काही महिन्यांचा कालावधी लागणार आहे. एका रिपोर्टनुसार रिपोर्ट्सनुसार, ट्रम्प मोबाईलची विक्री आयफोन १७ च्या आसपास सुरू होण्याची अपेक्षा आहे, यावरून लक्षांत येते की, आयफोन १७ शी स्पर्धा करण्यासाठी ट्रम्प फोन लाँच केला गेला आहे.
हा आयफोन १७ सप्टेंबरमध्ये भारतासह जागतिक बाजारपेठेत लाँच केला जाईल. भारत ही जगातील सर्वात मोठी स्मार्टफोन बाजारपेठ आहे, त्यामुळे ट्रम्प मोबाईल सप्टेंबरमध्ये भारतातही प्रवेश करू शकेल अशी अपेक्षा आहे. जर ट्रम्प मोबाईल भारतात आला तर हा फोन कोणत्या किमतीत लाँच केला जाऊ शकतो आणि आयफोन १७ च्या तुलनेत हा फोन किती स्वस्त असेल? चला संपूर्ण गणित समजून घेऊया.
ट्रम्प मोबाईलची किंमत अमेरिकेत $४९९ (सुमारे ४२,९११ रुपये) असणार आहे. जर हा मेड इन अमेरिका फोन भारतात लाँच केला गेला तर भारत या हँडसेटवर २५ किंवा ५० टक्के टॅरिफ लावू शकतो. जर भारताने २५ टक्के टॅरिफ लादला तर फोनची किंमत १० हजार ७२७ रुपयांनी वाढेल आणि जर ५० टक्के टॅरिफ लादला तर फोनची किंमत २१ हजार ४५५ रुपयांनी वाढेल. जर भारताने ट्रम्प मोबाईलवर २५ टक्के टॅरिफ लादला तर या फोनची किंमत ५३ हजार ६३८ रुपये होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. जर भारताने ट्रम्प मोबाईलवर ५० टक्के टॅरिफ लादला तर या फोनची किंमत ६४ हजार ३६६ रुपये होण्याची शक्यता आहे.
लीक आणि रिपोर्ट्सनुसार, भारतात आयफोन १७ ची संभाव्य किंमत ७९ हजार ९९९ रुपये असू शकते. भारत सरकारने ट्रम्प मोबाईलवर २५ टक्के टॅरिफ लादला तरी ट्रम्प फोन आयफोन १७ पेक्षा २६ हजार ३६१ रुपये स्वस्त असू शकतो. दुसरीकडे, जर सरकारने ट्रम्प मोबाईलवर ५० टक्के टॅरिफ लादला तर ट्रम्प फोन आयफोन १७ पेक्षा १५ हजार ६३३ रुपये स्वस्त असण्याची अपेक्षा आहे.