---Advertisement---

पख्तुनख्वातील पाकिस्तानच्या लष्करी तळावर ‘टीटीपी’ चा ताबा

by team
---Advertisement---

इस्लामाबाद : पाकिस्तान अफगाणिस्तानातील आणि तणावादरम्यान तहरिक-ए- तालिबान पाकिस्तान अर्थात् टीटीपीच्या अतिरेक्यांनी खैबर पख्तुनख्वाच्या बाजौर जिल्हयातील सालारजई परिसरातील पाकिस्तानी लष्कराच्या तळाचा ताबा घेतला. सोमवारी सकाळी पाकिस्तानी लष्करी तळाचा ताबा घेतला, असा दावा टीटीपीने केला. या परिसरात सातत्याने पाकिस्तानी सुरक्षा दलांवर हल्ले केले जात असून, दहशतवादी कारवाया वाढल्या आहेत.

अफगाणिस्तान आणि पाकिस्तानातील ड्युरांड सीमेवरील पाकिस्तानी तळाच्या घेतलेल्या ताब्याची चित्रफीत टीटीपीच्या दहशतवाद्यांनी समाज माध्यमांवर व्हायरल केली. पाकिस्तानी लष्कराने काही दिवसांपूर्वी हा तळ सोडला. त्यांना एका नवीन बळकट पायाभूत सुविधेत पाठवण्यात आले, असा दावा पाकिस्तानच्या वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्याने केल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमाने दिले. ही प्रक्रिया केवळ बाजौरपुरती मर्यादित नाही. उत्तर आणि दक्षिण वजिरीस्तानातील काही जुने तळ सोडून सैनिकांना नवीन तळावर हलवण्यात आल्याचे पाकिस्तानी लष्कराच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पाकिस्तानने अफगाणिस्तानातील टीटीपीच्या ठिकाणांवर केलेल्या हवाई हल्ल्याच्या विरोधात या दहशतवादी संघटनेने पाकिस्तानी सैन्यावर हल्ले सुरू केले आहेत. अफगाणिस्तानात टीटीपीच्या ठिकाणांवर अचूक हल्ले करण्यात आले होते. मात्र, पाकिस्तानने अधिकृतपणे हल्ल्यांना दुजोरा दिलेला नाही. दुसरीकडे, टीटीपीने केलेल्या हल्ल्यांत कित्येक पाकिस्तानी सैनिक ठार झाल्याचे वृत्त पाकिस्तानी माध्यमांत आले.

अफगाण-पाकिस्तानचे परस्परांवर हल्ले

पाकिस्तानने अलिकडेच अफगाणिस्तानमध्ये केलेल्या हवाई हल्ल्यानंतर दोन्ही देशांमध्ये रक्तरंजित हिंसाचार सुरू झाला आहे. दोन्ही देशांचे लष्कर परस्परांच्या सीमांमध्ये घुसून लोकांना मारत आहे. पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातील मागील काही दिवसांपासूनची परिस्थिती पाहता आणखी एक नवीन युद्ध सुरू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, पाकिस्तानने अफगाणिस्तामध्ये हल्ले करीत आठ जणांची हत्या केली, तर या हल्ल्यात १३ नागरिक जखमी झाले आहेत. पाकिस्तान सातत्याने अफगाणिस्तावर हल्ले करीत आहे. पाकिस्तानने शनिवारी पक्तियातील एका मशिदीवर मोर्टार हल्ला केला. यात तीन जणांचा मृत्यू झाला. पाकिस्तान सातत्याने सामान्यांना लक्ष्य करीत असल्याने आतंरराष्ट्रीय पातळीवर याची दखल घेतली जावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment