मुंबई : टीव्ही अभिनेत्री तुनिशा शर्माच्या मृत्यू प्रकरणी एक महत्वाची बातमी समोर आली आहे. अटक शीजानला वसई कोर्टाने ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आता या प्रकरणी पुढे कोणतं सत्य समोर येणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
पोलिसांना काय करावं लागणार
शीजान आणि तुनिशा यांच्यामध्ये नक्की कोणत्या कारणामुळे वाद झाले होते? याबाबत पोलिसांना आरोपीची चौकशी करायची आहे.
सुनावणीदरम्यान पोलिसांनी काय सांगितलं
न्यायालयात सुनावणीदरम्यान पोलिसांनी सांगितलं, शीजनचा मोबाईल एफएसएलकडे पाठवण्यात आला आहे. या प्रकरणी आणखी काही इलेक्ट्रॉनिक उपकरणेही जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
तुनिषाच्या जवळच्या व्यक्तींनी..
तुनिशा आणि शीजान एकमेकांना डेट करत होते. पण 15 दिवसांपूर्वी तुनिषाला कळालं की शीजान एका अन्य मुलीला देखील डेट करत आहे. यानंतर तुनिशा आणि शीजाय यांच्यात वाद सुरु झाल्याची माहिती तुनिषाच्या जवळच्या व्यक्तींनी दिली.
तुनिषा प्रचंड तणावात होती
या घटनेमुळे तुनिषा प्रचंड तणावात होती. यामुळे अभिनेत्रीला पॅनीक अटॅक देखील आला होता. ज्यानंतर तुनिशाला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयातच तुनिशाने शीजन करत असलेल्या फसवणुकीची माहिती कुटुंबीयांना दिली होती. असा कुटुंबीयांचा दावा आहे. दरम्यान, तुनिषाने बॉयफ्रेंड शीजानच्या मेकअपरूममध्ये गळफास घेतल्याने चर्चांना उधाण आलं आहे.
शीजानमुळेच तुनिशाने आत्महत्या केली..
अभिनेत्रीच्या आईने आत्महत्येनंतर केलेल्या आरोपांनंतर शीजानला पोलिसांनी ताब्यात घेतलं. त्यानंतर रात्री शीजानला अटक करण्यात आली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शीजान चौकशीला सहयोग करत नाही. विचारण्यात आलेल्या प्रश्नांची शीजान उलटसुलट उत्तरं देत आहे. शीजानमुळेच तुनिशाने आत्महत्या केली असल्याचा आरोप अभिनेत्रीची आई करत आहे.