भारत आणि पाकिस्तानमधील तणावादरम्यान तुर्कीने पाकिस्तानला पाठिंबा दिला. एवढेच नाही तर पाकिस्तानने ज्या शस्त्रांनी भारतावर हल्ला केला ती तुर्कीयेकडून मिळवली होती. यामध्ये प्रामुख्याने ड्रोन्सचा समावेश होता. या घटनेनंतर भारतात तुर्कीबद्दल संताप दिसून येत आहे आणि ‘बहिष्कार तुर्की मोहीम सुरू झाली आहे. या बहिष्कार अस्त्रामुळे तुर्कीचे २०० दशलक्ष डॉलर्सचे नुकसान झाले असून शेकडो कामगारांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत.
भारताच्या एका निर्णयामुळे एका मोठ्या तुर्की कंपनीला २०० दशलक्ष डॉलर्सचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. गुरुवारी, भारताने तुर्की विमान कंपनी सेलेबी एव्हिएशनवर कारवाई केली आणि तिची सुरक्षा मंजुरी तात्काळ रद्द केली. ही कंपनी भारतात ग्राउंड हँडलिंग सेवा देत होती. सरकारच्या या निर्णयानंतर, कंपनीचे मूल्यांकन फक्त दोन दिवसांत एक तृतीयांश कमी झाले. एवढेच नाही तर भारतात कंपनीसोबत काम करणान्या सुमारे ३.८०० कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्याही धोक्यात आल्या आहेत. सेलेबीची विमानतळ चालवण्यासाठीची सुरक्षा मंजुरी रद्द झाल्यानंतर कंपनीला सुमारे २०० दशलक्ष, म्हणजेच तिच्या जागतिक उत्पत्राच्या एक तृतीयांश नुकसान झाले.
सेलेबीची नऊ विमानतळांवर होती सेवा
२१ नोव्हेंबर २०२२ रोजी सेलेबी एअरपोर्ट सर्व्हिसेस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडला दिलेला सुरक्षा मंजुरी आता रद्द करण्यात आली आहे. सेलेबी एव्हिएशन देशातील नऊ प्रमुख विमानतळांवर सेवा देत होती, ज्यात दिल्ली. मुंबई आणि चेत्रई सारख्या संवेदनशील आणि मोठ्या विमानतळांचा समावेश होता. कंपनी ग्राउंड हँडलिंग, कार्गो सेवा आणि एअरसाईड ऑपरेशन्ससारख्या उच्च सुरक्षा ऑपरेशन्समध्ये सहभागी होती.