यावलमध्ये पिस्तूल खरेदी-विक्री करणाऱ्या दोघांना अटक

---Advertisement---

 

Yawal News : शहराबाहेर अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर दहिगाव फाट्याच्या जवळ एका ३४ वर्षीय तरुणांकडून एक जण गावठी बनावटीचे पिस्तोल आणि जिवंत काढतूस खरेदी करण्याकरीता बुधवारी मध्यरात्री आला होता. याची माहिती पोलिसांना मिळाली तेव्हा घटनास्थळी पोलिसांचे पथक दाखल झाले व या तरुणांकडून एक गावठी बनवण्याची पिस्तोल दोन जिवंत काडतूस पोलिसांनी पकडले व विक्री करणारा आणी घेणारा अशा दोन जणांना अटक करण्यात आली आहे. तर दोघांना यावल न्यायालयाने २८ सप्टेंबरपर्यंत चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे, तर या तरुणाने अजून कोणाला गावठी पिस्तूल विकले आहे का याचा तपास पोलीस करीत आहे.

यावल शहरातील बोरावल गेटजवळील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळील रहिवाशी युवराज उर्फ युवा राजू भास्कर वय ३४ हा तरुण वराडसिम (ता. भुसावळ) येथील भूषण कैलास सपकाळे वय ३१ या तरुणाला गावठी बनावटीचे पिस्तोल विक्री करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती.

हा विक्रीचा व्यवहार बुधवारी रात्री ११.५० मिनिटाला अंकलेश्वर बऱ्हाणपूर राज्य मार्गावर शहराच्या बाहेर दहिगाव फाट्याजवळ सुरू होता. तेथून पोलिसांच्या पथकाने दोघांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून गावठी बनावटीचे पिस्तोल, दोन जिवंत काडतूस जप्त करण्यात आले व या तरुणांना अटक करण्यात आली. तेव्हा या दोघांना गुरुवारी येथील न्यायालयात प्रथम वर्ग न्यायाधीश आर.एस. जगताप यांच्यासमोर हजर केले असते दोघांना २८ सप्टेंबरपर्यंतची चार दिवसाची पोलीस कोठडी सुनवण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक रंगनाथ धारबळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक फौजदार विजय पाचपोळे करीत आहे.

अजून कोणाकडे पिस्तोल विक्री केली काय?

या तरुणाने यापूर्वदिखील काही जणांना गावठी बनवण्याची पिस्तूल विक्री केली आहे का ? याचा तपास आता पोलीस करीत आहे. हा तरुण गेल्या काही दिवसापासून गावठी बनावटीचे पिस्तूल विक्री करत असत्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. तो हे गावठी पिस्तोल कुठून आणत होता. त्यांनी अजून कोणा कोणाला विकले याचा तपास आता पोलीस कोठडी पोलीस करणार आहेत.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---