---Advertisement---
नंदुरबार : शहादा शहर परिसरात विनापरवाना गावठी पिस्टल बाळगणाऱ्या दोन जणांना स्थानिक गुन्हा शाखेच्या पथकाने अटक केली. यात एका विधी संघर्षग्रस्त बालकाचा समावेश आहे.
शहादा शहरात जावदा रोडने अवैध गावठी पिस्टल घेवून येणाऱ्या संशयिताची गोपनीय माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस यांचे मार्गदर्शनानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास सूचना देत कारवाई केली.
यात स्थानिक गुन्हे शाखेचे पथक जावदा ते शहादा शहराकडे येणाऱ्या रोडवरील मंदाणे गावाचे बाहेरील रोडवर येऊन सापळा लावून दि.१९ मार्च रोजी बडवानी मध्यप्रदेश येथील अरविंद निगवने व त्याचेसोबत एक अनोळखी इसम असे दुचाकीने अवैध गावठी बनावटीचे पिस्टल घेवून येत असल्याचे दिसले. या दुचाकीस्वारास थांबवून चौकशी व झडती घेतली असता एमपी १० एमडब्ल्यू ५१८२ क्रमांकाच्या दुचाकीस्वाराने अरविंद निगवले, उमर्टी. ता वरला, जि. बडवानी आणि दुसरा विधी संघर्षग्रस्त बालक वय १६ वर्षे बडवानी मध्यप्रदेश असे दोन जण गावठी बनावटीचे पिस्टल मिळुन आले.
याबाबत परवाना असता त्याचेकडे परवाना नसल्याचे सांगितले. त्यानुसार या दोघांजणाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदुरबार जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्त. एस, अपर पोलीस अधीक्षक आशित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्था.गु.शा.चे पोलीस निरीक्षक हेमंत विचारणा केली पाटील, पो.उप.नि. मुकेश पवार, पो. उप.नि. विकास गुंजाळ, पो.हे.कॉ. पुरुषोत्तम सोनार, मोहन ढमढेरे, पो. ना. विकास कापुरे, पो.शि. शोएब शेख, भरत उगले, सतिश घुले यांनी केली.









