---Advertisement---

जळगावात दोन डॉक्टरांच्या दुचाकी लंपास, अंगणवाडी सेविका बेपत्ता

---Advertisement---

जळगाव : सुमारे ४५ हजार किमतीची होंडा शाईन तसेच सुमारे २५ हजार किमतीची होंडा, अशा दोन दुचाकी चोरट्यांनी जिल्हापेठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरून नेल्या. या प्रकरणी वाहनधारकांच्या तक्रारीनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

नयन भीमराव संदानशिव (वय २५, मूळ रा. भीमनगर, अकोला, ह.मु. शासकीय महाविद्यालय व रुग्णालय, जळगाव) M हे प्रशिक्षणार्थी डॉक्टर आहेत. यांच्या मालकीची २५ हजार रु. किमतीची होंडा दुचाकी (एमएच ३०- बीई ००३५) ही २० मार्च रोजी रात्री आठ वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात सिव्हिल सर्जन यांच्या ऑफिससमोर पार्किंग केली होती. चोरट्याने ही दुचाकी चोरून नेली. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (२२ मार्च) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास हवालदार रवींद्र ठाकरे हे करीत आहेत.

डॉ. शेख उसामा शेख नसीम (वय २४) रा. तोंडापूर, ता. जामनेर) हे त्यांच्या मालकीची सुमारे ४५ हजार रुपये किमतीची दुचाकी होंडा शाईन (एमएच २०-एफक्यू ९७२८) ने शुक्रवारी (२१ मार्च) रात्री नऊ वाजता शहरातील नायक हॉस्पिटल येथे आले. गेटच्या बाजूला दुचाकी लावून ते कामासाठी निघून गेले. रात्री ९.३० वाजता ते आले असता त्यांना दुचाकी दिसली नाही. परिसरात शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (२२ मार्च) जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तपास पोलीस नाईक संतोष सोनवणे हे करीत आहेत.

अंगणवाडी सेविका बेपत्ता

जळगाव : २४ वर्षीय अंगणवाडी सेविका कोणाला काहीएक न सांगता दुकानातून बाहेर पडली. त्यानंतर बेपत्ता झाली. शुक्रवारी (२१ मार्च) दुपारी तीन वाजता शहरातील फुले मार्केट येथे घटना घडली. नातेवाइकांनी शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार शनिवारी (२२ मार्च) शहर पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment