शिर्डी हादरली ! एका तासाच्या अंतरात साई संस्थानच्या तीन कर्मचाऱ्यांवर प्राणघातक हल्ला, दोघांचा मृत्यू

शिर्डी: सोमवारी पहाटे तिघांवर चाकू हल्ला झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे .एका तासाच्या अंतरात वेगवेगळ्या ठिकाणी तिघांवर चाकूने वार करून दोघांची हत्या करण्यात आली .यात एक तरुण गंभीर जखमी आहे .शिर्डीतील साई संस्थानमध्ये दोघे कर्मचारी पहाटे ड्युटीला येत असताना ही घटना घडली .

मिळालेल्या माहितीनुसार पहाटे हे कर्मचारी शहरातील वेगवेगळ्या भागांतून कामावर निघाले होते त्यावेळी अज्ञांतानी हा हल्ला केला. यात दोघे ठार झाले. तर तिसरा कर्मचारी गंभीर जखमी झाला. ही घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.

हेही वाचा : दारूच्या नशेत पत्नीची वेगळीच मागणी, नकार दिल्याने पतीला दिला बेदम चोप!

या घटनेत सुभाष साहेबराव घोडे, नितीन कृष्णा शेजुळ या दोन साईसंस्थान कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला असून कृष्णा देहरकर हा तरुण गंभीर जखमी असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत . घटनेची माहिती सकाळीच मिळूनही पोलीस उशिरा आल्याचा आरोप मृत कर्मचाऱ्यांचे कुटुंब करत आहे . हत्याकांडाला अपघात असल्याचं सांगितलं जात असल्याने कुटुंबीय मोठा आक्रोश करत आहेत .शिर्डीमध्ये तणावाचे वातावरण आहे .

हेही वाचा : धक्कादायक! महिलेने पतीला दिल्या झोपेच्या गोळ्या अन्… नेमकं काय झालं?

दरम्यान शिर्डीतील एका तारांकीत हॉटेलमध्ये हैद्राबाद येथील एका भाविकानं गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना रविवारी समोर आली. ही धक्कादायक घटना शिर्डीतील मारी गोल्ड हॉटेलमध्ये घडली. मरम रेड्डी अमरनाथ रेड्डी असे आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. त्याने आधी रूम बुक केली. नंतर शालच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकरणानंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे.