खान्देशातील दोघांची यूपीएससी परीक्षेत भरारी

जळगाव : केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) नागरी सेवा परीक्षा (CSE) 2023 चा निकाल जाहीर केला आहे. यात खान्देशातील दोघांनी यश संपादन केले आहे. यात जळगाव जिल्ह्यातील प्रितेश बाविस्कर व नंदुरबार जिल्ह्यातील दोंडाईचा येथील मयूर गिरासे यांचा समावेश आहे.

भरतसिंग पौलदसिंग गिरासे रा. कुंभारे ह.मु.दोंडाईचा यांचे चिरंजीव मयूर भरतसिंग गिरासे UPSC AIR देशातून 422 उत्तीर्ण रँक प्राप्त करून IAS झाला. एरंडोल तालुक्यातील कासोदा येथिल कै. अशोक बाविस्कर यांचे सुपुत्र प्रितेश याने युपीएससी द्वारे घेण्यात आलेल्या नागरी सेवा 2023 या परीक्षेत देशातून 767 रँक प्राप्त करून घवघवीत यश मिळविले. देशभरातून साधारणता 14 लाख विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षा दिली होती. प्रितेश याने अत्यंत परिश्रमाने यशाला गवसणी घातली . प्रितेशच्या यशामध्ये त्याची आई उज्वला अशोक बाविस्कर व लहान बंधू संदेश अशोक बाविस्कर यांचा सिंहाचा वाटा आहे. वडिलांच्या मृत्यूनंतर आईचे आशीर्वाद त्याच्या पाठीशी होते. आईच्या खंबीर पाठिंबामुळे व प्रतिकूल स्थितीतून आईच्या मेहनतीने प्रितेशने हे यश संपादन केले.