पाकिस्तानसाठी हेरगिरी करणारे दोघे गजाआड, चौकशीत धक्कादायक खुलासा

---Advertisement---

 

सुरक्षा संबंधित एका मोठ्या प्रकरणात, अरुणाचल प्रदेश पोलिसांनी हेरगिरी टोळीचा भंडाफोड करीत जम्मू-काश्मीरचे रहिवासी असलेल्या दोघांना अटक करण्यात आली. अरुणाचल प्रदेशच्या संवेदनशील भागातून महत्त्वाची माहिती गोळा करून ती पाकिस्तानातील त्यांच्या हँडलरला पाठवल्याचे आरोपींनी चौकशीत कबूल केले. अटक केलेल्या आरोपींची नावे ऐजाज अहमद भट आणि बशीर अहमद गनई अशी आहे.

पोलिस महानिरीक्षक चुकू आपा यांनी सांगितले की, जम्मू-काश्मीरच्या कुपवाडा येथील दोन आरोपी अरुणाचल प्रदेशच्या संवेदनशील भागात फिरत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यानंतर त्यांना चांगलांग जिल्ह्यातील मियाओ येथून पकडण्यात आले. संवेदनशील भागातून महत्त्वाची ती माहिती गोळा करून पाकिस्तानातील त्यांच्या हँडलरला पाठवल्याचे आरोपीनी कबूल केले.

त्यानंतर इटानगर येथून नझीर अहमद मलिक, साबीर अहमद मीर आणि आलो शहरातून कापड व्यापारी हिलाल अहमद यांना अटक करण्यात आली. सर्व आरोपी पाकिस्तानसाठी हेरगिरी करायचे. आरोपी प्रामुख्याने ब्लँकेट विकायचे. या व्यवसायाच्या नावाखाली ते राज्याच्या विविध भागात फिरत असत आणि सुरक्षा आणि इतर धोरणात्मक महत्त्वाची संवेदनशील माहिती गोळा करायचे. येत्या काही दिवसांत आणखी काही लोकांची अटक होण्याची शक्यता आहे. ते पाकिस्तानमध्ये कोणाच्या संपर्कात होते आणि आतापर्यंत किती माहिती त्यांनी पाकिस्तानला पाठवली याचा तपास सुरू आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---