---Advertisement---

लष्कर-ए-तोयबाच्या दोन दहशतवाद्यांना अटक, एके-५६ सह बॉम्ब, काडतुसे जप्त

---Advertisement---

नागरिकांमध्ये लपून राहत प्रसंगी मोठा हल्ला करण्यात तरबेज मानल्या जाणाऱ्या लष्कर-ए-तोयबाच्या दोन कुख्यात दहशतवाद्यांना शोपियान जिल्ह्यात अटक करण्यात आली आहे. त्यांच्याजवळून अत्याधुनिक शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पा दोघांची अटक म्हणजे मोठे यश मानल्या जात आहे.

जनतेमध्ये मिसळून प्रसंगी घातक वार करणाऱ्यांना हायब्रीड दहशतवादी असे म्हटले जाते. सरकारच्या यादीत या दहशतवाद्यांचा समावेश नसल्याने त्यांची ओळख पटविणे कठीण असते. त्यांना पकडणेही सोपे नसते. पण, अत्यंत गुप्त माहिती मिळवित त्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवले.

पुंछमधील बसकुचान भागात एका बागेत संशयास्पद हालचालींची माहिती मिळताच लष्कराने परिसराला वेढा देऊन शोधमोहिम सुरू केली. दहशतवाद्यांना निसटण्याची संधीच मिळाली नाही एवढ्या वेगाने सुरक्षा दतांनी झडप घातली.

इरफान बशीर आणि उझेर सलाम अशी या दहशतवाद्यांची नावे असून त्यांच्याजवळून दोन एके-५६ रायफली, चार मॅग्झिन्स, १०२ काडतुसे, दोन ग्रेनेड. दोन पाऊच, साडेपाच हजारांची रोकड, मोबाईल फोन, स्मार्टवॉच आणि आधार कार्ड जप्त करण्यात आले. या प्रकरणी गुन्हे दाखल करून तपास सुरू करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

---Advertisement---

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment