काश्मीरमध्ये दोन पाकिस्तानी दहशतवाद्यांना अटक, लष्कर-ए-तोयबाशी संबंधित तीन जण ताब्यात

---Advertisement---

 

श्रीनगर : जम्मू-काश्मीर पोलिसांनी लष्कर-ए-तैयबाच्या दहशतवादी मॉड्यूलशी संबंधित एकूण ५ लोकांना अटक केली आहे. यापैकी दोन पाकिस्तानी दहशतवादी आहेत, तर इतर तिघे त्यांचे हस्तक आहेत. अब्दुल्ला उर्फ अबू हुरेरा, असे एका दहशतवाद्याचे नाव आहे. तो १६ वर्षांपासून फरार होता. तर दुसऱ्या दहशतवाद्याचे नाव उस्मान उर्फ खुबैब, असे आहे.

या ऑपरेशनमध्ये जम्मू-काश्मीर पोलिसांसोबतच केंद्रीय यंत्रणाही सहभागी होत्या. जम्मू काश्मीर, राजस्थान आणि हरियाणासह १९ ठिकाणी शोधमोहीम राबवण्यात आली. काही वस्तूही जप्त करण्यात आल्या. तपासात लष्कर-ए-तैयबाच्या एका नेटवर्कचा पर्दाफाश झाला. जे दहशतवाद्यांना लॉजिस्टिक्स आणि आर्थिक मदत करत होते.

अधिकाऱ्यांनी पुढे सांगितले की, तपासात एक दहशतवादी इतर राज्यांमध्ये लष्कर-ए-तैयबा नेटवर्कच्या मदतीने बनावट कागदपत्रे आणि ओळखीच्या आधारे देशाबाहेर जाण्यात यशस्वी झाला. दहशतवाद्यांनी सुमारे १६ वर्षांपूर्वी २०१० मध्ये भारतात घुसखोरी केली होती. या काळात ते काश्मीर खोऱ्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये सक्रिय होते. यादरम्यान, त्यांनी सुमारे ४० दहशतवाद्यांचे नेतृत्व केले. यापैकी बहुतेकांना सुरक्षा दलांनी ठार केले आहे.

तिघे सीमेपलीकडील हँडलर्सच्या संपर्कात होते

अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, पकडलेल्या पाच जणांमध्ये श्रीनगरमधील तीन जणांचा समावेश आहे. मोहम्मद नकीब भट, आदिल रशीद भट आणि गुलाम मोहम्मद मीर उर्फ मामा, अशी आरोपींची नावे आहेत. तिघांनाही दहशतवाद्यांना आश्रय आणि जेवणासह लॉजिस्टिक मदत दिल्याबद्दल अटक करण्यात आली आहे.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---