---Advertisement---
जळगाव : जिल्ह्यतील गुन्हेगारी घटनांमध्ये सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. काही दिवसांपूर्वीच बोदवड येथे एका स्वयंपाक्याला हातपाय बांधून मारहाण करण्यात आली होती. दोन दिवसांआधी तालुक्यातील कानसवाडे गावातील उपसरपंचाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे, तर भुसावळात सराईत गुन्हेगारचा खून झाल्याने जळगाव जिल्हा हादरला आहे. जिल्ह्यतील या घटना ताज्या असताना मुकाईनर तालुक्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कर्नाटकातील दोन जणांना मारहाण करून लूटमार करण्यात आली आहे. दोघानांकडून आठ लाखांचा ऐवज लुटण्यात आला आहे. या प्रकरणी मुक्ताईनगर पोलिसांत अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कर्नाटक राज्यतील बंगळुरू येथील अभिषेक एस. सी. आणि त्यांचा मित्र सतीश हे मलकापुर तालुक्यातील धुपेश्वर मंदिरात दर्शनासाठी आले होते. दर्शन घेऊन ते शनिवार दिनांक 22 मार्च रोजी अजिंठा येथे जाण्यासाठी निघाले.
मुक्ताईनगर तालुका हद्दीत त्यांना एक महिला भेटली. तिने मधापुरी धरणाजवळ रिसॉर्ट बांधण्यासाठी खूप चांगली जमीन विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले. अभिषेक हे व्यावसायिक असल्याने त्यांनी यासाठी होकार दिला. यानंतर ते मधापुरी गावात गेले.
मधापुरीत पोहचताच अचानक दहा जणांनी त्यांना घेरले. यानंतर दोघांना लाथा-बुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. आणि अभिषेक व सतीश यानंतर त्यांच्या खिशातील २ लाखांची रोकड७५ हजारांची अंगठीदीड लाखाचं ब्रेसलेट२५ हजारांचा स्मार्टफोनयूपीआयद्वारे ४ लाखांची तात्काळ ट्रान्सफरअसा एकूण साडेआठ लाखांचा ऐवज लुटला.
यानंतर या दोघांचे हरीणाच्या कातड्यासोबत फोटो काढले. “जर पोलीसात तक्रार केली तर हे फोटो सोशल मीडियात व्हायरल करण्यात देऊ” अशी धमकी त्यांना दिली. यानंतर आरोपींनी तेथून पळ काढला.
अभिषेक आणि सतीश यांनी तातडीनं मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांच्या तक्रारीवरून दहा अज्ञात आरोपींविरुद्ध खुनाच्या प्रयत्नासह लुटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक नागेश मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरिक्षक नयन पाटील हे करीत आहेत.