भरधाव कारची मोटारसायकलला धडक, दोघा भावंडांचा जागीच मृत्यू

---Advertisement---

 

भरधाव कारने मोटारसायकलला दिलेल्या जोरदार धडकेत झालेल्या भीषण अपघातात वर्डी गावातील दोन तरुण जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना सोमवारी घडली. घटनेचे वृत्त गावात येऊन धडकताच शोककळा पसरली. मयत दोघे सख्खे भाऊ असल्याने एकाच कुटुंबात काळाने घाला घातल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

हा अपघात चोपडा तालुक्यातील वर्डी फाटा ते वडती फाट्याच्या अंकलेश्वर-बहऱ्हाणपूर महामार्गावर घडला. मगन जगन बारेला (वय २५) व रगन जगन बारेला (वय १८) (दोन्ही रा. वर्डी, ता. चोपडा) अशी मृत भावंडांची नावे आहेत. सोमवार (८ सप्टेंबर) रोजी संध्याकाळी पाच वाजेचा सुमारास अडावद-चोपडा दरम्यान वडती फाट्याजवळ अडावदकडून चोपडाकडे जाणाऱ्या चारचाकी (एमएच ०४ एचएफ ८२९६) ने समोरून भरधाव येणाऱ्या दुचाकीने जोरदार धडक दिली.

या धडकेत दुचाकीवरील स्वार मगन जगन बारेला (२५) व रगन जगन बारेला (१८, दोन्ही रा. वर्डी, ता. चोपडा) हे दोन्ही सख्खे भाऊ जागीच ठार झाले. अपघातानंतर अडावद पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक प्रमोद वाघ यांनी घटनास्थळ गाठून वाहतूक सुरळीत केली. चोपडा उपजिल्हा रुग्णालयातील प्रशांत पाटील यांनी दोघांना रुग्णवाहिकेद्वारे उपजिल्हा रुग्णालयात वैद्यकिय उपचारासाठी दाखल केले.

यावेळी डॉ. पवन पाटील यांनी दोघांना मृत घोषित केले. उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. पवन पाटील यांनी शविच्छेदन केले. याबाबत चोपडा शहर पोलिसात अकस्मात मृत्युची नोंद करण्यात आली व ही नोंद शून्य क्रमांकाने अडावद पोलिसात वर्ग करण्यात आली.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---