दोन विषयांच्या पेट परीक्षेला विद्यापीठाचा ‌‘खो’ युजीसीच्या नव्या नियमापुढे विद्यापीठे हतबल

डॉ. पंकज पाटील : जळगाव:  कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातर्फे पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी पीएचडी पूर्व प्रवेश परिक्ष्ाा नुकतीच ऑनलाईन घेण्यात आली. विद्यापीठात असलेल्या सर्व विषयांच्या पेट परिक्ष्ाा घेण्यात आली असली तरी वृत्तपत्रविद्या व जनसंवाद आणि पाली भाषा या दोन विषयांच्या पेट परिक्ष्ाा घेण्यास विद्यापीठाने यावर्षी ‌‘खो’ दिला आहे. विद्यार्थ्यांमधील संशोधकवृत्तीसह नवनविन संशोधन व्हावे यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या नियम व निकषानुसार देशभरातील सर्व युजीसी मान्यता प्राप्त विद्यापीठांमध्ये वर्षातून दोन वेळेस पीएचडी प्रवेश पूर्व परिक्ष्ाा घेण्याचा नियम आहे.

पेट परिक्ष्ोच्या आयोजनात विलंब  युजीसीच्या 2010 च्या नियमानुसार विद्यापीठाने पहिलीच पेट परिक्ष्ाा 2010 मध्ये ऑफ लाईन घेतली होती. 2010 ते 2023 या 14 वर्षांच्या कालावधीत एका वर्षाला दोन या प्रमाणे 28 पेट परिक्ष्ाा घेणे अपेक्ष्ाीत होत. मात्र विद्यापीठाने सन 2010, 2012, 2014, 2017, 2019, 2021 व 2023 या वर्षांनाच पेट परिक्ष्ाा घेतली आहे. ही वर्षे वगळता 2011,2013,2015,2016,2018,2020,2022 या वर्षात पेट परिक्ष्ाा घेतलेली नाही. त्यामुळे या वर्षात पदव्युत्तर पदवी घेऊन पीएचडी करण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या विद्यार्थ्यांना पीएचडी करता आली नाही. जनसंवाद व पत्रकारीता व पाली भाषेच्या परिक्ष्ोला खो सप्टेंबर 2023 मध्ये विद्यापीठातर्फे ऑनलाईन पेट परिक्ष्ाा विद्यापीठात घेतली. यात जनसंवाद व पत्रकारीता आणि पाली भाषा या दोन विषयांची पेट परिक्ष्ाा घेण्यास विद्यापीठाने ‌‘खो’ दिला आहे. त्यामुळे या दोन विषयात पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा हिरमोड झाला आहे.

एकच गाईड अन्‌‍ जागा फुल्ल  उमवित पाली भाषा व जनसंवाद व पत्रकारीता या विषयासाठी केवळच एकच मार्गदर्शक आहे. जनसंवाद व पत्रकारीता विषयाच्या मार्गदर्शकांकडे 4 तर पाली भाषेतील मार्गदर्शकांकडे 8 विद्यार्थी संशोधनाचे कार्य करत आहेत. त्यामुळे या दोन्ही मार्गदर्शकांकडे नविन संशोधक विद्यार्थी देता येत नसल्याने विद्यापीठाने या दोन्ही विषयांच्या सन 2023 च्या पेट परिक्ष्ाा घेण्यास ‌‘खो’ दिला आहे.

युजीसीचा नियम ठरतो जाचक

2021 पासून युजीसीने पीएचडीच्या मार्गदर्शकांबाबत नवा नियम लागू केला आहे. पीएचडीसाठी मार्गदर्शक (गाईड) नियुक्त करताना तो त्या विद्यापीठाच्या कार्यक्ष्ोत्रातील असावा. विद्यापीठ कार्यक्ष्ोत्राबाहेरील म्हणजे शासनमान्य व युजीसीमान्य विद्यापीठे, महाविद्यालयातील नसावा. म्हणजे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या जळगाव, धुळे व नंदुरबार या जिल्ह्यातीलच असावा. हा नियम  देशभरातील सर्व विद्यापीठांना लागु आहे. याच नियमामुळे केवळ उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातीलच नव्हे तर देशभरातील विद्यापीठांना लागु आहे. हाच नियम संशोधक विद्यार्थ्यांना व विद्यापीठांना जाचक ठरत आहे.