Taloda Crime News : कासवाची खरेदी विक्री करणाऱ्या दोघांना वनकोठडी

तळोदा : मुंबई वनविभागाच्या पथकाच्या गुप्त माहितीच्या साहाय्याने शहादा वनविभागाने कासवाची खरेदी करणाऱ्या दोघांना अटक करुन त्यांच्याकडील एक कासव जप्त केले आहे. दोघांवर वनगुन्हा नोंदवण्यात आला आहे. त्यांना न्यायालयापुढे हजर केले असता त्यांची १८  सप्टेंबरपर्यंत वनकोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

अयाज आबिद अन्सारी व रहिम अशफाक अन्सारी असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शहादा वनविभागाच्या पथकाने शहादा शहरातील जुना प्रकाशा रोडवरील सालदार नगरात,कासवाची खरेदी विक्री करतांना दोघांना अटक केली आहे.

ही कारवाई अक्राणी सहा. वनसंरक्षक रोहयों  एस. डी. साळुंके, यांच्या मार्गदर्शनाखाली वनपरिक्षेत्र अधिकारी वनपरिक्षेत्र अधिकारी गस्ती पथक शहादा एस. बी. रत्नपारखे व स्टाफ, व वनपरिक्षेत्र अधिकारी अक्राणी चारूशीला काटे  , तसेच वन्यजीव मित्र शहादा सागर निकुंभ व त्यांची टीम, वनपाल वरा आर. बी, भोरे, वनपाल शहाणा ए. एन. तावडे,  वनपाल जयनगर एस. एथ पवार, वनपाल मंदाना प्रियांका बिरारे, वनरक्षक वर्षा निकुंभे, वनरक्षक तपासणी खेड अर्चना बिरारे, वनरक्षक तपासणी नाका शहादा नितीन पाटील, नईम मिर्झा तसेच वाहनचालक ज्ञानेश्वर पवार यांच्या पथकाने केली.

पुढील कारवाई वनसंरक्षक  धुळे  नीनु सोमराज तसेच संतोष सस्ते उपवनसंरक्षक सी. नंदुरबार, तथा सदगीर विभागीय वन अधिकारी धुळे, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यवाही केली तसेच पुढील तपास वनपाल दरा करीत आहे.