सिहोरहुन परतणाऱ्या भाविकांवर काळाचा घाला, पातोंडाच्या दोन महिला ठार

अमळनेर : मध्यप्रदेशातील सिहोर येथील कुबेश्वर धाम येथे 16 फेब्रुवारीपासून सात दिवसीय रुद्राक्ष महोत्सव सुरू झाला आहे. दरम्यान, या कार्यक्रमातुन परतणाऱ्या अमळनेर तालुक्यातील पातोंडा येथील भाविकांच्या खाजगी वाहनाचा मध्य प्रदेशात अपघात झाला असून यात  दोन महिला ठार झाल्याची घटना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास घडली. शोभबाई लुकडू पाटील (वय 52) व कमल बाई आत्माराम पाटील (वय 55) असे मयत महिलांचे नाव आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

 

मध्य प्रदेशातील सिहोर येथे पंडीत प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथेसाठी पातोंडा ता. अमळनेर येथील भाविक खाजगी वाहनाने गेले होते. दरम्यान, सिहोरहुन परताना आज सकाळी 5 वाजेच्या सुमारास त्यांच वाहन क्रमांक एम एच 19 डी व्ही 6783 ला मध्य प्रदेशातील जुलवानिया जवळ अपघात झाला.

या अपघातात शोभबाई लुकडू पाटील (वय 52) व कमल बाई आत्माराम पाटील (वय 55) टा. दोन्ही पातोंडा ता. अमळनेर मृत्यू झाला. तर अन्य जण जखमी आहेत. जखमींना जुलवाणियाच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.