Jalgaon News : ‘प्रवेश घेण्यासाठी जातेय’, सांगून महाविद्यालयात गेलेल्या दोन तरुणी बेपत्ता

---Advertisement---

 

जळगाव : महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी गेलेल्या दोन तरुणी बेपत्ता झाल्याच्या घटना समोर आल्या आहे. जळगाव तालुक्यातून २२ वर्षीय तरुणी बेपत्ता झाली आहे. तर अमळनेर तालुक्यातून १९ वर्षीय तरुणी बेपत्ता झाल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे.

अमळनेर येथे महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जाते, असे सांगून घरातून निघालेली तालुक्यातील एका गावातील तरुणी हरवल्याची झाल्याची तक्रार तिच्या भावाने केली आहे. १९ वर्षीय तरुणी सकाळी ११ वाजता अमळनेर येथे महाविद्यालयात प्रवेश घेऊन येते, असे सांगून लहान बहिणीला सोबत घेऊन निघाली. त्यानंतर संध्याकाळी पाचच्या गाडीने येते, असे सांगून लहान बहिणीला तिने दुपारी ३ वाजेच्या बसने पाठवून दिले. मात्र, सायंकाळच्या बसनेदेखील ती परत न आल्याने कुटुंबीयांनी शोध सुरू केला. मात्र, एक दिवस उलटूनही तपास न लागल्याने मुलीच्या भावाने मारवड पोलिसांत हरवल्याची तक्रार दाखल केली आहे.
पुढील तपास हेकॉ मुकेश साळुंखे हे करीत आहेत.

दुसरी घटना, घराची चाबी आजोबांकडे देऊन महाविद्यालयात प्रवेश घेण्यासाठी जळगाव येथे जाऊन येते, असे सांगुन घराबाहेर पडलेली २२ वर्षीय तरुणी जळगाव तालुक्यातून बेपत्ता झाली. गुरुवारी (२६ जून) सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली. हवालदार किरण पाटील हे तपास करीत आहेत.

बेपत्ता तरुणी पोलिसांना मिळाली

जळगाव : घराबाहेर पडलेली बावीस वर्षीय तरुणी शुक्रवारी (२० जून) बेपत्ता झाली. उशिरापर्यंत तरुणी घरी न परतल्याने कुटुंबियांनी शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात मिसिंग दाखल करण्यात आली होती. तपासात ही तरुणी पोलिसांना २० जून रोजी मिळुन आली. कुटुंबियांना बोलवून तिला स्वाधीन करण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---