---Advertisement---

Jalgaon News : दोन तरुण बेपत्ता, तर १५ वर्षीय अल्पवयीन मुलीस पळवून नेले!

---Advertisement---

जळगाव : पेट्रोल पंपावर कामाला जातो, असे सांगून घराबाहेर पडलेला २३ वर्षीय तरुण गुरुवारी (२० मार्च) रात्री ११ वाजता मोहाडी (ता. जळगाव) येथून बेपत्ता झाला. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार बुधवारी (२६ मार्च) मिसिंग एमआयडीसी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली. हवालदार किरण पाटील तपास करीत आहेत.

अल्पवयीन मुलीस पळवून नेले
जळगाव : कुटुंबातील सदस्यांसह झोपलेल्या १५ वर्षीय मुलीला फूस लावून पळवून नेले. ही घटना मंगळवारी (२५ मार्च) रात्री नऊ वाजेच्या सुमारास एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली. कुटुंबातील सदस्यांनी सर्वत्र शोध घेतला असता मुलीचा तपास लागू शकला नाही. या प्रकरणी तक्रारीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. सहायक पोलीस निरीक्षक अनिल वाघ हे तपास करीत आहेत.

शेतातून निघालेला तरुण बेपत्ता

जळगाव : काम करताना मी घरी जातो, असे सांगून शेतातून निघालेला तरुण बेपत्ता झाला. एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात ही घटना शनिवारी (२२ मार्च) दुपारी एक वाजेच्या सुमारास घडली. कुटुंबीयांनी २१ वर्षीय तरुणाचा सर्वत्र शोध घेतला असता तपास लागला नाही. याप्रकरणी तक्रारीनुसार मिसिंग दाखल करण्यात आली. तपास हवालदार किरण पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment