तरूण भारत लाईव्ह | मुंबई : कोकणात बारसू रिफायनरीवरून चांगलाच वाद पेटला आहे. उद्धव ठाकरे यांनी ग्रीन रिफायनरीच्या समर्थनार्थ पत्र लिहीण्यासाठी मोठी रक्कम स्वीकरल्याचा आरोप भाजपचे नेते निलेश राणे यांनी केला आहे.
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या कोकणातील कार्यक्रमाला तसेच भाजपच्या रिफायनरीच्या समनार्थ होणार्या कार्यक्रमांना परवानगी नाकरण्यात आली आहे. यासंदर्भात उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले आहे. याला भारतीय जनता पक्षाचे नेते निलेश राणे यांनी जोरदार प्रत्युउत्तर दिले. ते जनतेशी संवाद साधत होते. ते पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी यांची ‘मन की बात’ ची भाषा कोणालाच कळत नसल्याचे उद्धव ठाकरे म्हणातात. पंतप्रधान हे जनतेच्या मन की बात समजत असल्यानेच लोकांनी त्यांना पुन्हा निवडून दिले आहे. मात्र, उद्वव ठाकरे मन की बात समजतात की धन की बात समजतात हे त्यांनी आम्हाला सांगावं.
उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री असतांना पंतप्रधानांना पत्र काढून बारसूत रिफायनरी झाली पाहिजे याचे समर्थन केले होते. परंतु, ते विरोधी पक्षात असतांना रिफायनरीला विरोध करत आहेत. रिफायनरी समर्थनास विरोध करण्याचा नेमका विचार कसा बदलला आहे. हा विचार कोकणातील जनतेसाठी बदलला नसून खिशात पैसे आले पाहिजेत, मातोश्रीवर खोके पोहचले पाहिजे याकरिता बदलला आहे. तत्कालीन ठाकरे सरकारने ग्रीन रिफायनरीला पंतप्रधानांना समर्थनार्थ पत्र दिले होते. त्या एका पत्राची किंमत १०० कोटी होती अशी माहिती आम्हाला मिळाली आहे. ठाकरे व त्यांचे कुटूंब यांचा असा कोणता व्यवसाय आहे की ते हेलिकॉप्टरमधून फिरतात असा प्रश्न निलेेश राणे यांनी उपस्थित केला आहे.