मुंबई : ठाकरे गटातून आतापर्यंत ४० च्या वर नगरसेवक व आमदार पक्ष सोडून गेले आहे आणि अजून पण सत्तांतर चालू आहे. उद्धव ठाकरे गटाला दररोज हादरे बसत आहेत. लोकप्रतिनिधी आणि पदाधिकाऱ्यांचे ठाकरे गटातुन इतर पक्षात आऊटगोइंग सुरूच असून मंगळवारी त्याचा प्रत्यय आला. मातोश्रीचे निकटवर्तीय आणि आमदार अनिल परब यांच्या निकटवर्तीय माजी नगरसेवकाने मंगळवारी शिवसेनेत प्रवेश केला असून ठाकरेंसमोरचे आऊटगोइंगहे आव्हान अधिकाधिक खडतर बनत चालले आहे.
दि. २७ जून रोजी ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेवक संजय अगलदरे यांनी शिवसेनेचे प्रवेश केला आहे. अगलदरे हे माजी मंत्री अनिल परब यांची निकटवर्तीय मानले जातात. त्यामुळे त्यांना हा मोठा धक्का मानला जात आहे.
मुंबईतील माजी नगरसेवकांनी धरली शिंदेंच्या सेनेची वाट(शिवसेनेत प्रवेश केलेल्या माजी नगरसेवकांची नावे) पुढीलप्रमाणे; यशवंत जाधव, सुवर्णा कारंजपे,परमेश्वर कदम, वैशाली शेवाळे, दिलीप लांडे (नगरसेवक + आमदार), मानसी दळवी, किरण लांडगे, समाधान सरवणकर, अमेय घोले, संतोष खरात ,दत्ता नरवनकर, सान्वी तांडेल, आत्माराम चाचे, चंद्रावती मोरे, संजय अगलदरे या लोकप्रतिनिधींनी (शिवसेना) शिंदे गटात प्रवेश केला आहे