मुंबई : उद्धव ठाकरे हे महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिन्ना आहेत, असा घणाघात मनसे नेते प्रकाश महाजन यांनी केला आहे. तसेच संजय राऊतांना विशाळगडाच्या अतिक्रमणावर बोलण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.
रविवारी केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली होती. उद्धव ठाकरे हे ‘औरंगजेब फॅन क्लब’चे नेते आहेत, असे ते म्हणाले होते. यावर बोलताना प्रकाश महाजन म्हणाले की, “उद्धव ठाकरेंना मी महाराष्ट्राचे नवीन मोहम्मद अली जिन्ना म्हणेन. मुस्लीम त्यांच्या आणि ते मुस्लिमांच्या प्रेमात पडले आहेत. त्यामुळे शंकराचार्यांना घरी आणून त्यांनी त्यांचे पाय धुतले तरीही हिंदू काही त्यांच्याकडे वळतील असं वाटत नाही,” असे ते म्हणाले.
तसेच यावेळी त्यांनी संजय राऊतांवरही निशाणा साधला. ते म्हणाले की, “संजय राऊत विशाळगडाच्या अतिक्रमणावर काहीतरी बोलावं. सकाळचा माईक का बदं झाला. त्यांनी बोलायला हवं,” असा खोचक टोला प्रकाश महाजन यांनी लगावला आहे.