‘उदो दुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा’ पुरस्काराचे वितरण

तरुण भारत लाईव्ह  न्यूज : धनराज विसपुते फाउंडेशन, आदर्श शैक्षणिक समूह धुळे, भाजप महिला मोर्चा आणि ‘तरुण भारत’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘उदो दुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा’ पुरस्काराचे मंगळवारी भाजपच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांच्या हस्ते थाटात वितरण झाले. आमदार सुरेश भोळे, समूहाचे अध्यक्ष धनराज विसपुते यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.

‘बेटी बचाओ बेटी पढाओ’ या संकल्पनेतून, शाश्वत विकासासाठी महिला सक्षमीकरणाच्या उद्देशाने ‘उदो दुर्गेचा, जागर स्त्री शक्तीचा’ या कार्यक्रमांतर्गत मंगळवारी महिलांचा सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हा भाजपा महिला मोर्चातर्फे राष्ट्रपिता ते राष्ट्रनेता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्ताने साजरा करण्यात आलेल्या, सेवा पंधरवड्याचे औचित्य साधून हा उपक्रम घेण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजप महिला मोर्चा प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ, आमदार सुरेश भोळे, बेटी बचाओ – बेटी पढाओ अभियानाचे राष्ट्रीय समन्वयक राजेंद्र फडके, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी, जामनेरच्या नगराध्यक्षा साधना महाजन, माजी महापौर सीमा भोळे, महिला आघाडी महानगर अध्यक्षा दीप्ती चिरमाडे, ग्रामीण अध्यक्षा रेखा पाटील, जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा रंजना पाटील, महिला जिल्हा उपाध्यक्षा जयश्री अहिराव, प्रदेश उपाध्यक्षा उज्ज्वला बेंडाळे, डॉ.राधेश्याम चौधरी, विशाला त्रिपाठी यांच्यासह प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वालन झाले.

महिलांचा सन्मान करणारे सरकार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून बाबासाहेबांमुळे आपणास मतदानाचा अधिकार प्राप्त झाल्याचे चित्रा वाघ यावेळी म्हणाल्या. त्या पुढे म्हणाल्या, आपण सर्वांना नेहमी सांगत असतो, मातृशक्ती ओळखा. आपल्याला आपली ताकद ओळखता आली पाहिजे. मैत्रिनींनो, लिडरशिपचे गुण प्रत्येकीमध्ये आहेत पण ते वापरता आले पाहिजे. राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारवर विरोधक टीका करत असतात, मात्र राज्यातील याच सरकारने महिलांचा सन्मान केला आहे. दिल्लीतील ‘लव्ह जिहाद’च्या घटनेचा निषेध करून अबताभला फाशीची झाली पाहिजे आणि ती होणार, असे सांगून आपणही आपल्या मुला-मुलींमध्ये संवाद ठेवला पाहिजे असे त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अनेक योजना तळागाळातील जनतेसाठी दिल्या, त्या सर्वांपर्यंत पोहोचविण्याची गरज व्यक्त करत त्यांनी महिलांशी संवाद साधला.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राचार्य जाई जगताप यांनी केले, तर शेवटी आभार कविता देशमुख यांनी मानले.

तरुण भारत’चा उल्लेख

कार्यक्रमाबाबत धनराज विसपुते यांनी सविस्तर माहिती दिली. या उपक्रमात ‘तरुण भारत’चे सहकार्य लाभल्याचे त्यांनी आवर्जुन सांगितले. महिला शक्तीचा गौरव व्हावा या उद्देशाने दरवर्षी हा उपक्रम राबविला जात असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक दीप्ती चिरमाडे यांनी केले. यावेळी डॉ. राजेंद्र फडके, दीपक सूर्यवंशी, जयश्री अहिराव आदींनी मनोगत व्यक्त केले. ग्रामीण जिल्हाध्यक्ष आमदार सुरेश भोळे यांनीही मनोगत व्यक्त केले. उदो दुर्गेचा जागर स्त्री शक्तीचा पुरस्कार हा महिलांच्या कार्याचा गौरव करणारा असल्याचे ते म्हणाले.

या कार्यक्रमास भाजपच्या कार्यकर्त्या व शहरातील विविध भागातून आलेल्या महिलांची उपस्थिती होती. सामाजिक कार्यकर्त्या सुधा काबरा यांच्या समर्थक महिलांनी भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांचे स्वागत चित्रा वाघ, आमदार सुरेश भोळे यांनी केले.

यांचा झाला सत्कार

उत्तंग भरारी पुरस्कार- रिझवाना बशिर खॉन, सुरेखा मनोजकुमार पाटील, दीपाली हेमंत वैद्य, आरती विकास पाटील, मीनल विजय झोपे, लताबाई सोपान महाजन, संजीवनी संजय यावलकर, वैष्णवी विजय शर्मा, प्रा. डॉ. योगिता पांडुरंग चौधरी. उंच माझा झोका पुरस्कार- गौरी गणेश महाजन, शुभांगी विठ्ठल फासे, सुनीता नरहर पाटील, प्राजक्ता कैलास सोनवणे, मीना ओंकार सैंदाणे, श्रुती सचिनसिंग ठाकूर, भूमिका संजय नेहेते, विशाखा विलास देशमुख, दीपिका मनोहर माळी. उत्साहाचा झरा पुरस्कार- हर्षाली प्रवीण चौधरी, करूणा मधुकर सोनार, शारदा बाबुलाल दांडगे, सुवर्णा वसंत पाटील, अनिता संजय अग्रवाल, रेखा अशोक कुलकर्णी, प्रियंका विशाल त्रिपाठी, अलका रवींद्र चौधरी, शीतल मुकेश विसपुते यांना गौरविण्यात आले, तर सामाजिक कार्यकर्त्या सुधा काबरा यांना विशेष पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.