---Advertisement---
राष्ट्रीय चाचणी संस्था (NTA) उद्या, मंगळवारी २२ जून रोजी ‘मे’ सत्रासाठी UGC NET परीक्षा २०२५ चा निकाल जाहीर करणार आहे. हा निकाल राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ,एनटीएच्या अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in वर प्रसिद्ध करण्यात येईल. जे परीक्षेत बसलेले विद्यार्थी त्यांचा नोंदणी क्रमांक आणि जन्मतारखेद्वारे निकाल तपासू शकतील. राष्ट्रीय चाचणी संस्थेने २५ जून ते २९ जून दरम्यान देशभरातील नियुक्त केंद्रांवर ही परीक्षा घेतली.
राष्ट्रीय चाचणी संस्थेने नुकतेच त्यांच्या सोशल मीडिया अकाउंटवर अधिकृत घोषणा केलीय आहे. यानुसार जून सत्रासाठी दहावी, यूजीसी नेट २०२५ चा निकाल मंगळवारी २२ जुलै २०२५ रोजी जाहीर केला जाईल. तात्पुरती उत्तरपत्रिका ५ जुलै रोजी प्रसिद्ध करण्यात येईल आणि उमेदवारांना त्यांचे आक्षेप नोंदवण्यासाठी ६ ते ८ जुलैपर्यंत वेळ देण्यात आला. निकालासोबतच, NTA अंतिम उत्तरपत्रिका देखील जारी करू शकते.
---Advertisement---
जून २०२५ चा UGC NET निकाल असा तपासा:
UGC NET निकाल २०२५ कुठे तपासायचा? अधिकृत वेबसाइट ugcnet.nta.ac.in ला भेट द्या.
होम पेजवर दिलेल्या UGC NET जून २०२५ निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
आता नोंदणी क्रमांक आणि जन्मतारीख प्रविष्ट करा आणि सबमिट करा.
निकाल तुमच्या स्क्रीनवर दिसेल.
आता तपासा आणि प्रिंटआउट घ्या.
अंतिम उत्तरपत्रिका आणि कट-ऑफ निकालासोबत प्रसिद्ध केले जातील.
सहाय्यक प्राध्यापक आणि JRF + सहाय्यक प्राध्यापक या दोघांसाठी कट-ऑफ श्रेणीवार आणि विषयवार फक्त जाहीर केला जाईल. भारतीय विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये ज्युनियर रिसर्च फेलोशिप आणि असिस्टंट प्रोफेसर पात्रता आणि पीएचडी अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी वर्षातून एकदा यूजीसी-नेट परीक्षा घेतली जाते. यूजीसी नेट निकालांचे पुनर्मूल्यांकन किंवा पुनर्तपासणी होणार नाही.
निकाल जाहीर झालेल्या अंतिम उत्तर कीवर आधारित असेल. एकूण ८५ विषयांसाठी ही परीक्षा सीबीटी पद्धतीने घेण्यात आली. गेल्या सत्रात ४८,१६१ उमेदवार सहाय्यक प्राध्यापक पदासाठी पात्र ठरले होते. परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या ८,४९,१६६ उमेदवारांपैकी ६,४९,४९० उमेदवारांनी परीक्षेला बसले.