ग्रामीण भागातील कुशल महिलांनी आपल्या हस्तकलेच्या आणि व्यावसायिक कौशल्याच्या जोरावर तयार केलेली उत्पादने ‘उमेद मार्ट’च्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत पोहोचत आहेत. महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाच्या ‘उमेद’ उपक्रमांतर्गत सुरू झालेल्या या ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममुळे महिला उद्योजिकांसाठी आर्थिक स्वावलंबनाचा नवा मार्ग तयार झाला आहे.
महाराष्ट्राच्या मातीतील उत्पादने, आता तुमच्या घरापर्यंत
उमेद मार्टवर पारंपरिक हस्तकलेसोबतच पर्यावरणपूरक आणि ग्रामीण महाराष्ट्राच्या परंपरेशी नाळ जोडणारी उत्पादनेही उपलब्ध आहेत. येथे तुम्हाला मिळतील –
- टिकाऊ आणि स्टायलिश कोल्हापुरी चपला – खऱ्या चामड्यापासून तयार केलेल्या, सुंदर डिझाईन्समध्ये उपलब्ध
- हस्तमागावरील पारंपरिक शाली आणि ब्लँकेट्स – उत्कृष्ट गुणवत्तेसाठी ओळखल्या जाणाऱ्या
- पारंपरिक वस्त्रप्रकार – नऊवारी साड्या, पैठणी, आणि इतर महाराष्ट्रीयन पारंपरिक पोशाख
- आरोग्यदायी शुद्ध सेंद्रिय गूळ – नैसर्गिक चव आणि उच्च पोषणमूल्यांसाठी खास
- घरगुती पूजेसाठी आवश्यक वस्तू – सुगंधी अगरबत्ती, शुद्ध कापूर आणि पारंपरिक पूजेच्या सामग्रीचे विविध प्रकार
या प्लॅटफॉर्ममुळे ग्राहकांना ग्रामीण महिलांच्या हातची अस्सल उत्पादने थेट मिळत आहेत, तर महिला उद्योजिकांना संधी मिळत आहे स्वतःचं अर्थकारण मजबूत करण्याची.
घरबसल्या पारंपरिक आणि उपयुक्त उत्पादने खरेदी करण्यासाठी आजच भेट द्या –
👉 www.umedmart.comhttps://www.umedmart.com
‘उमेद मार्ट’ म्हणजे ग्रामीण महिलांसाठी हक्काची ऑनलाइन बाजारपेठ आणि तुमच्यासाठी स्वदेशी, टिकाऊ आणि दर्जेदार खरेदीचं वन स्टॉप सोल्यूशन!