पुण्यातील अवैध शस्त्रांचे कनेक्शन निघाले ‘उमर्टी’, शस्त्र सप्लायर्सचा शोध सुरू

---Advertisement---

 

जळगाव : मध्यप्रदेशातील उमर्टी येथील गावठी कट्ट्यांचा व्हाया चोपडामार्गे सप्लाय केला जात होता. पुणे येथील पोलिसांनी शनिवारी पहाटे उमर्टी (म.प्र.) येथे धडक कारवाई करत ५० अवैध गावठी कट्टयांचे कारखाने जमीनदोस्त केले. याप्रकरणी सात जणांना अटक केली, तर याप्रकरणात सहभागी ३६ संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. २१ गावठी कट्टयांसह शस्त्रावर शिक्के व नावे छापण्याचे साहित्य हस्तगत केले.

मध्यप्रदेश एटीएसच्या मदतीने पुणे पोलिसांनी ही मोठी कारवाई केली. पोलीस उपायुक्त सोमय मुंडे यांच्या मार्गदर्शनात १०५ अधिकारी व कर्मचारी, शीघ्र कृती दल, गॅस गन सेक्शन, वायरलेस आणि सीसीटीव्ही टीमसह मोठा फौजफाटा उमर्टी येते कारवाईत उतरला होता. या अॅक्शन कारवाईत मोबाइल सर्व्हिलन्स व्हॅन, बुलेटप्रूफ जॅकेट्स, बॉडीवॉर्न कॅमेऱ्यांचाही समावेश केला होता. अवैध शस्त्र सप्लाय करणाऱ्यांचाही तपासात शोध सुरू आहे.

शस्त्र सप्लाय करणाऱ्या एंजटला पकडण्यासाठी चोपडा येथुन पोलीस गेले होते. तेव्हा पोलिसाला बांधुन मारहाण केल्याची घटना घडली होती. मध्यप्रदेश पोलिसांच्या मदतीने या पोलिसाची सुटका करण्यात आली होती. त्यामुळे उमर्टी येथे कारवाई करणे म्हणजे जीवावर बेतण्यासारखे होते. यासर्व परिस्थितीचा अंदाज घेत आणि अभ्यास करत पुणे पोलिसांनी मोठी खबरदारी घेत कारवाई करण्याचा अॅक्शन प्लॅन केला होता.

यासंदर्भात कमालीची गोपनीयता पाळण्यात आली होती. उमर्टी साखरझोपेत असताना पोलिसांनी संशयितांना घेरत धडक कारवाई केली. त्यानुसार पुणे पोलिसांनी मध्य प्रदेशात मोठी कारवाई करण्याचे नियोजन केले. त्यासाठी मध्यप्रदेशातील एटीएस पथकाची मदत घेतली. गोपनीय माहितीनुसार उमर्टी येथे पहाटे पोलिसांनी छापा टाकला. अवैध शस्त्र निर्मितीचा म ोठा अड्डा पोलिसांना मिळाला. येथे लहान लहान अवैध कारखान्यात शस्त्रे तसेच सुटे भाग तयार केले जात होते. ते पोलिसांनी हस्तगत केले. शस्त्र तयार करणारे लहान लहान ५० कारखाने दिसून आले.

याप्रकरणी तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पूर्व) मनोज पाटील, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, उपायुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली उपायुक्त (परिमंडळ चार) सोमय मुंडे, पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक पोलीस निरीक्षक नितीन नाईक, मदन कांबळे तसेच कल्याणी कासोदे यांच्या पथकाने केला.

पुढे काय ?
उमर्टी येथे निर्मित गावठीकट्टे विक्रीसाठी अन्यत्र एजंट अथवा पंटर कार्यरत होते किंवा कसे? त्यांच्याकडे थेट अवैध शस्त्रे विक्रीसाठी सप्लाय केले जात होते किंवा त्यांच्या ताब्यात संशयित आरोपी देत होते काय? या अनुषंगाने या तपासातून पाहिले जात असून संशयित आरोपींकडून शस्त्रे सप्लाय करण्याच्या पध्दती जाणुन घेण्याला तपासाधिकाऱ्यांनी प्राधान्य दिल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---