---Advertisement---

महिला बचत गटांसाठी राज्यात ‘उमेद मॉल’, मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी, योजनेसाठी २०० कोटींचा निधी

---Advertisement---

---Advertisement---

राज्यातील ग्रामीण महिला बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान अर्था उमेदअंतर्गत १० जिल्ह्यांमध्ये जिल्हा विक्री केंद्र अर्थात ‘उमेद मॉल’ उभारण्यास मंगळवारी (२९ जुलै) झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली. या योजनेसाठी एकूण २०० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

महिलांतील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अध्यक्षस्थानी होते. ग्रामीण भागातील उद्यमशीलतेला चालना देणे आणि स्वयंसहाय्यता समूहांच्या (एसएचजी) उत्पादनांना स्थानिक व राष्ट्रीय बाजारपेठ मिळवून देणे, या उद्देशाने हे मॉल उभारले जाणार आहेत. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांत ही योजना राबविण्यात येईल.

नंतर टप्प्याटप्प्याने अन्य जिल्ह्यांत विस्तार करण्यात येणार आहे. प्रत्येक मॉलसाठी कमाल २० कोर्टीपर्यंत खर्च केला जाणार आहे. हे मॉल संबंधित जिल्हा परिषदेच्या जागेवर उभारले जातील. मॉलमध्ये गटांसाठी चक्राकार गाळ्यांची व्यवस्था, तसेच संवाद, प्रशिक्षणासाठी स्वतंत्र हॉलसारख्या सुविधा असतील.

जिल्ह्यात पूर्वीच ‘बहिणाबाई मार्ट’ ने अंमलबजावणी

दरम्यान, जळगाव जिल्ह्यात जिल्हा नियोजनच्या निधीतून पालकमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, खासदार, आमदारांच्या मान्यतेने ‘उमेद’ मार्फत या योजनेची अंमलबजावणी ‘बहिणाबाई मार्ट’ या नावाने पूर्वीच सुरू झाली आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली, जिल्हाधिकारी या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे ग्रामीण भागात पाच आणि शहरी भागात पाच, अशा दहा विक्री केंद्रांचे भूमिपूजन पूर्ण झाले असून, बांधकामास सुरुवात करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल आणि जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक राजू लोखंडे काम पाहत आहेत.

  • मंत्रिमंडळ बैठकीत ग्रामीण महिलांच्या आर्थिक सबलीकरणासाठी, स्थानिक उत्पादनांना सशक्त बाजारपेठ मिळवून देण्यासाठी आणि गटांना टिकाव मिळवून देण्यासाठी ‘उमेद मॉल’ योजना मंजूर झाली आहे. हा बचत गट चळवळीच्या आर्थिक उन्नतीसाठी एक महत्त्वपूर्ण टप्पा ठरेल.
    गुलाबराव पाटील – पाणीपुरवठा व स्वच्छतामंत्री तथा पालकमंत्री, जळगाव

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---