पुणे: बारावीच्या परीक्षेचा ताण सहन न झाल्याने एका विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरील परीक्षा कक्षातून उडी मारली, अशी धक्कादायक घटना मंगळवारी नर्हे येथे घडली.
या घटनेमुळे परीक्षेच्या तणावाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. राज्य मंडळाच्या बारावी परीक्षेला इंग्रजी विषयाच्या पेपरने सुरुवात झाली. परीक्षा सुरू झाल्यानंतर अर्ध्या तासानेच संबंधित विद्यार्थ्याने दुसऱ्या मजल्यावरून उडी घेतली. आधी तो पहिल्या मजल्यावर पडला, पण त्यानंतर त्याने पुन्हा उडी मारली.
हेही वाचा : India Post GDS Recruitment 2025: भारतीय टपाल विभागात 21,413 पदांसाठी मोठी भरती, पाहा संपूर्ण यादी
या घटनेवेळी शिक्षण विभागाचे भरारी पथक परीक्षाकेंद्रावर उपस्थित होते. घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी विद्यार्थ्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. राज्य मंडळाने परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी कठोर उपाययोजना केल्या आहेत. मात्र, यामुळे विद्यार्थ्यांवरचा मानसिक ताण वाढत आहे का, याबाबत शिक्षण तज्ज्ञ आणि पालक चिंतेत आहेत. राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी सांगितले की, परीक्षेच्या दबावामुळेच विद्यार्थ्याने उडी घेतली असावी. मात्र, याबाबत अधिक चौकशी सुरू आहे.
हेही वाचा :कर्जाच्या हप्त्याने जुळले सूत ! नवऱ्याला सोडून विवाहितेने थाटला बँक कर्मचाऱ्यासोबत संसार
पालक आणि शिक्षकांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याची गरज
विद्यार्थ्यांनी परीक्षा तणावाबाबत खुल्या मनाने बोलले पाहिजे.
पालक आणि शिक्षकांनी मानसिक आधार देणे गरजेचे आहे.
परीक्षेचा ताण कमी करण्यासाठी शाळांनी मार्गदर्शन सत्रे घ्यावीत.