जळगाव : शहरामध्ये अनेक जणांनी विनापरवानगी जाहिरातीचे फलक (होर्डिंग्ज) लावल्याचे दिसून येत आहे. या पार्श्वभूमीवर बुधवार, २६ एप्रिलपासून फलक जप्तीची मोहीम राबवून कारवाई केली जाणार असल्याची माहिती मनपातर्फे देण्यात आली आहे. कारवाई टाळण्यासाठी संबंधितांना असे फलक तात्काळ काढून घ्यावे, असेही आवाहन प्रशासनाने केले आहे.
तसेच ज्या जाहिरात फलक, होर्डिंग्जधारकांनी मनपाची परवानगी घेतलेली आहे.परंतु फलक लावण्याची प्रत्यक्ष मागणी, मंजूर संख्या व या संख्येपेक्षा जास्त फलक लावल्याचे आढळून आल्यास असेही फलक जप्त करुन त्यांच्यावर महाराष्ट्र मालमत्तेच्या विरूपणास प्रतिबंध अधिनियम १९९५ नुसार कारवाई केली जाणार आहे.