---Advertisement---

Nandura crime: किरकोळ कारणावरून पुतण्याच्या हातून काकाचा खून

by team
---Advertisement---

नांदुरा : शेतीच्या कामासाठी काकाने आपला ट्रॅक्टर सांगितला नसल्याच्या क्षुल्लक कारणावरून पुतण्याने वाद घालून काकाची कुऱ्हाडीचे घाव घालून निघृण हत्या केल्याची खळबळजनक घटना २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास शहरापासून हाकेच्या अंतरावरील सोनज येथे घडली.

याप्रकरणी नांदुरा पोलिसांनी आरोपीस अटक करून हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. गोपाल मनोहर बोके असे मृताचे तर शुभम विठ्ठल बोके असे आरोपीचे नाव आहे.

गोपाल मनोहर बोके हे २९ मार्च रोजी सकाळी साडेनऊच्या सुमारास पत्नी आणि मुलगा विश्वजित असे तिघे घरी हजर असताना त्यांचा पुतण्या शुभम विठ्ठल बोके हा घरी आला आणि जुने भांडण व शेतीच्या कामासाठी आपला ट्रॅक्टर का सांगितला नाही, या कारणावरून काका गोपाल बोके यांच्यासोबत वाद घालून त्यांना शिवीगाळ करू लागला. यावेळी त्याने गोपाल यांच्यावर जीवघेणा हल्ला करून त्यांच्या छातीत व मानेजवळ कुन्हाडीने सपासप वार केल्याने गोपाल बोके यांचा मृत्यू झाला.

या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ माजली. या घटनेनंतर मृत गोपाल यांचा मुलगा विश्वजित बोके यांनी नांदुरा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी शुभम बोके याला विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून अटक केली. पुढील तपास ठाणेदार विलास पाटील करीत आहेत.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment